मलकापूर : जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला निषेधार्थ असून अत्यंत दुःखद आहे. हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्नअसून काश्मीर पुन्हा अशांत करण्याचे कारस्थान आहे. या घटनेचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या वतीने महामहीम राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत निवेदन देऊन दिनांक 25 एप्रिल रोजी निषेध नोंदविण्यात आला.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे,की प्रत्येक सहृदय माणसाचं मन पिळवटून जाईल, धाड असणाऱ्या प्रत्येक माणसाचं रक्त खवळून उठेल अशी अत्यंत घृणास्पद आणि एकाचवेळी करूण अशी घटना काल पहलगाम, जम्मू-काश्मीर येथे घडली.प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला याचं तीव्र दुःख झालं असणार आहे. दहशतवाद्यांनी धर्माची खात्री करून घेऊन मग मारलं.दहशतवाद्यांनी मारताना हिंदू आहेत याची खात्री केली आणि मग अंदाधुंद गोळीबार केला आणि नरबळी घेतले.ज्यांनी आपलं माणूस गमावलंय त्या कुटुंबांची आयुष्यभराची वाताहात या दहशतवाद्यांनी करून ठेवली आहे.खूप काही मनात साधून येतंय, खूप काही मनात खवळून उठतंय.अशावेळी शब्दांची फुंकरही दिलासा देणारी असते.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला अत्यंत निषेधार्ह आणि दुःखद आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन याचा निषेध केला पाहिजे.आज या निवेदनाद्वारे आपणास सादर की सरकारने सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. आणि या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने लवकरच योग्य ती पावले उचलावीत. हा हल्ला करणान्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दहशतवादी विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात यावा, दहशतवादी छावण्या उध्वस्त करण्यात याव्या यांना मदत करणान्या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात बुलढाना जिल्हा मधील मलकापुर, खामगांव, ज. जामोद, संग्रामपुर,नांदुरा, शेगांव, संग्रामपुर,तामगांव येथे करण्यात आली .असे निवेदनात नमूद केले आहे मलकापुर येथे निवेदन देते वेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कांग्रेस पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्रीराम प्रतिष्ठान,शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हनुमान सेना,करणी सेना यासह शहरातील विविध राजकीय, सामजिक पक्ष संघटना यासह धर्म प्रेमी बंधू,सकल हिंदू समाज, सहभागी झाल्या होते .
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिन्दू समाज द्वारे जम्मू कश्मीर येथील घटनेचा देशव्यापी तीव्र निषेध...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق