Hanuman Sena News

राणा सांगा यांच्या जयंती निमित्त रक्त स्वाभिमान संमेलन आगरा येथे बुलढाणा जिल्ह्यातील क्षत्रिय युवा होणार सहभागी - हिंदूनेता जिवनसिंग राजपूत


मलकापुर: गेल्या काही दिवसांपासून महाराणा सांगा यांच्या बद्दल उत्तरप्रदेश मधील समाजवादी पार्टी चे रामलाल सुमन यांनी चुकीचा टिपनी करत  क्षत्रिय समाजाच्या भावना दुखावल्या त्या नंतर राजपूत संघटनेच्या लोकांनी रामलाल सुमन यांच्या घराचा घेराव केला सुमन यांनी माफी मागावी तसेच त्यांची सदस्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली त्याच पार्श्वभूमीवर सर्व समाजाच्या वतीने 12 एप्रिल रोजी राणा सांगा यांची जयंती असल्याने आगरा येथे रक्त स्वाभिमान संमेलन आयोजित करण्यात आले असून यात देशभरातील क्षत्रिय उपस्थित राहणार आहे समाजाचे नेतृत्व राजदादा शेखावत गुजरात जिवनसिंग शेरपूर मध्यप्रदेश विरु दादा उत्तरप्रदेश यांच्याशी संपर्क साधून  महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हिंदू क्षत्रिय युवा महाराणा भक्तांना घेऊन हिंदूनेता जिवनसिंग राजपूत आगरा येथील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत तरी जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم