यत्र नार्यस्तु पुज्यते l
रमंतो तत्र देवता लाल
नांदुरा :जिथे नारी-महिलांचा आदर करून पूज्य भाव व्यक्त केला जातो,तिथे देव देवता ही रमतात,निवास करतात,वैदिक पौराणिक काळापासून आलेल्या 'देवी सुक्त' मध्ये याचा उल्लेख आहे. नारी ही शक्तीचं रूप आहे , संपूर्ण जीवन दुसऱ्यासाठी वाहून देणारी, प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडणारी, समाजामधे पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रगती करत आहे ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अजित कॉन्व्हेंट, चांदुर बिस्वा येथे महिला दिन साजरा करण्यात आला. विद्येची आराध्य दैवत माँ शारदा,राजमाता जिजाऊ, तसेच सर्व मुलींना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये प्रस्तावना शिक्षिका सिमा भगत तसेच सूत्रसंचालन कोमल मांडवकार व भाग्यश्री घाईट यांनी केले. मुख्याध्यापिका सरिताताई बावस्कार यांनी महिला दिनाबद्दल माहिती देऊन 'महिला हिच शक्तीचं रूप' या विषयावर संबोधन केले. त्यानंतर सर्व महिलांचे रस्सी सायकलिंग, फनी गेम, संगित खुर्ची, प्रश्नमंजुषा, उखाणा इ. खेळ घेण्यात आले. जिंकलेल्या सर्व महिलांना क्राऊन व मिसेस स्मार्ट च्या सॅश ने व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. फायनल राऊंड मधल्या विजेत्या यांना युनिक क्राऊन व अजित क्विन म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्व महिलांनी कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
إرسال تعليق