मलकापूर, दि. 28 फेब्रुवारी 2025 – स्थानिक नगर सेवा समिती द्वारा संचालित ली. भो. चांडक कनिष्ठ विद्यालयातील प्राध्यापक गिरीशजी वैद्य यांच्या सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी मा. भाऊसाहेब डोरले अध्यक्षस्थानी होते, तर सुगनचंदजी भंसाली, संजयजी चांडक, ऍड. अभिजित एदलाबादकर आणि प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कला शिक्षक प्रमोद किन्होळकर यांनी सत्कारमूर्ती गिरीशजी वैद्य सरांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, वैद्य सर हे संवेदनशील, मानवतावादी दृष्टिकोन असलेले आणि खेळाडू वृत्तीने नेहमी उत्साही राहणारे शिक्षक होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात साध्य आणि साधन यांचा सुरेख समन्वय साधत उत्कृष्ट प्रकारे आपले कार्य पार पाडले.प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, वैद्य सरांच्या सेवानिवृत्तीमुळे शाळेत मोठी पोकळी निर्माण होणार आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य शालेय कामकाजासाठी समर्पित केले असून प्रत्येक जबाबदारी अत्यंत विश्वासाने पार पाडली.त्यांच्या यशस्वी प्रवासामागे त्यांच्या सुविद्य पत्नींची मोठी साथ आहे.संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व सेवा गौरव पत्र देऊन गिरीशजी वैद्य सरांचा भव्य सत्कार करण्यात आला.या प्रसंगी वैद्य सरांनी शाळेला पन्नास इंची तीन टीव्ही संच भेट दिले. तसेच सेवा निवृत्त शिक्षिका सौ. छाया बांगर यांनी सुद्धा शाळेला भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी चाळीस हजाराची देणगी दिल्या बद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना वैद्य सर म्हणाले, "माझ्या यशाचे श्रेय माझे गुरु माननीय भाऊसाहेब डोरले आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाला जाते. संस्थेने दाखवलेल्या विश्वासामुळेच मी प्रत्येक जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो."अध्यक्षीय समारोपात मा. भाऊसाहेब डोरले यांनी वैद्य सरांच्या शाळा व संस्थेसाठीच्या योगदानाची प्रशंसा केली. ते म्हणाले वैद्य सर हे एक उत्कृष्ट शिक्षक,उत्तम संघटक, कुशल प्रशासक होते.त्यांच्या कार्यकुशलतेमुळेच शाळेतील अनेक कामे सुरळीत झाली आहे. एक सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ता म्हणून परिवाराने त्यांना सदैव प्रोत्साहन दिले आहे.तसेच त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन पंकज शुक्ल यांनी केले.कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समर्पित शिक्षकी जीवनाचा सन्मान – गिरीश वैद्य सरांचा भावनिक निरोप...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق