मलकापूर: अखिल भारतीय कुणबी महासंघ अंतर्गत अखिल भारतीय कुणबी मराठा वधू वर सूचक मंडळाच्या वतीने कुणबी मराठा समाजाचा वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी मराठा मंगल कार्यालय टेलिफोन कॉलनी रोड मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे.तरी या मेळाव्याला सदरील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कुणबी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री शिवा पाटील गोंड, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक मा. एड. साहेबरावजी मोरे, राहतील तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रख्यात उद्योजक, योगीराज कन्स्ट्रक्शन खामखेडा, मुक्ताईनगर चे मा. श्री विनोदरावजी सोनवणे, बुलढाणा येथील समाजसेवक मा. श्री सुभाषराव गवळी, मलकापूर येथील उद्योजक मा. श्री. जगन्नाथ जाधव, बुलढाणा येथील शिवव्याख्याते प्रा. मनोजभाऊ सोनुने, खामगाव येथील कुणबी महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वरजी भगत, वाशिम जिल्ह्यातील समाजसेवक मा श्री बाबुरावजी भोयर, पुणे येथील युवा उद्योजक श्री विवेकजी तिव्हाणे, ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. राजाभाऊजी कराळे, मा. श्री भागवतरावजी बोंडे, माननीय श्री प्रदीप जी खडके माननीय श्री संजयजी मांजरे मा. श्री किसनरावजी कंकाळे, मा. श्री राजेशजी मुंगळे, मा. सौ कल्पनाताई ढोरे, मा. श्री लक्ष्मणराव टप, यांची उपस्थिती लाभणार आहे.तसेच परिचय मेळाव्याच्या दिवशी उपवर युवक युवती यांच्या पालकांनी व नातेवाईकांनी सोबत येताना दोन परीचे पत्राच्या प्रती व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे या मेळाव्याला घटस्फोटीत विधवा युवक युवती यांनी सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहून नोंदणी करून जीवनसाथी पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य करावे. विदर्भ व खानदेश मधील समाज बांधव व उपवर युवक युवती या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या कुणबी मराठा वधू-वर परिचय मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री अमोल भाऊ टप, सचिव युवराज माताडे, शरद मोरखडे राजेश कापसे हेमंत रिंढे सचिन कापसे श्रीकृष्णजी भगत यांनी केले.
मलकापुर येथे कुणबी मराठा वधु वर परिचय मेळावा 23 मार्चला...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق