Hanuman Sena News

समाजाचे उदयनमुख नेतृत्व अमोल भाऊ टप...



 मलकापूर : समाजाचे राहून समाजासाठी काही करण्याची इच्छा असेल तर आपण आपला वाढदिवस समाजासाठी करू शकतो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विशेष दिवस असतो प्रत्येक जण आपापल्या परीने वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो असाच एक वाढदिवस मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ टप यांनी सेवा देण्याचा मानस केला.तसेच मलकापूर शहरात सार्वजनिक व सामाजिक सेवा कार्य करत आहेत. प्रत्येकाशी मिळून- मिसळून सुसंवाद ठेवण्याची त्यांची कार्यपद्धत आहे,त्यांच्या प्रत्यक्षदर्शी स्वभावाचे अवलोकन करून हनुमान सेना महाराष्ट्र राज्य मलकापूर संस्थेचे अध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे.त्यांच्या सहभागातून हनुमान सेनेला चांगली भरारी मिळालेली आहे त्यांच्याकडे कोणतीही व्यक्ती कोणत्याही मदतीच्या अपेक्षेने गेल्यास रिकाम्या हाताने कधी परतत नाही. मलकापूर शहरात राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात त्यांची मोलाचे योगदान आहे या योगदानातूनच अमोल भाऊ टप यांनी अनेक बेरोजगार तरुणांना स्वयम रोजगाराच्या आपल्या परीने संधी उपलब्ध करून दिल्या आहे तसेच रुग्णांना रक्त उपलब्ध करूनही देतात.आजही मलकापूर शहरातील विविध सामाजिक कार्यात जातीभेद न ठेवता त्यांचा सक्रिय सहभाग असतो मलकापूर शहरातील एक समाजसेवी व मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख आहे त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाचे अवचित पाहून हनुमान सेनेच्या माध्यमातून निवासी मतिमंद/ मूकबधिर  शाळा मलकापूर येथे विद्यार्थ्यांना फळ, बिस्कीट वाटप करण्यात आले तसेच संजीवनी ब्लड बँक मलकापूर येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यात 20 रक्तदात्याने रक्तदान करून अमोल भाऊंचा वाढदिवस साजरा केला 40 बिघा परिसरात वृक्षारोपण केले तसेच मोहनराव नारायणराव नेत्रालय मलकापूर येथे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत नेत्र तपासणी  शिबिर आयोजित करण्यात आले.गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या व सायंकाळी 7 वाजता गाडेगाव हनुमान मंदिर येथे हनुमान चालीसा पठण करण्यात आले या संपूर्ण दिवसभरात अनेक ज्येष्ठ व युवावर्ग,विविध स्तरावरील राजकीय नेते मंडळींनी भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष मलकापूर शहराचे हिंदुत्ववादी आमदार चेनसुखजी संचेती व भाजपा परिवारांनी भाऊंना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला मलकापूर शहरातून व ग्रामीण भागातून अनेक युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती लावली त्यामुळे अमोल भाऊना अजातशत्रू म्हणून ओळखले जाते...
 मतिमंद व मूकबधिर वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना फळ आणि बिस्किटे वाटप  

 नेत्र शिबिर 

 गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप 
 सामूहिक हनुमान चालीसा पठण 
 अमोल भाऊ टप रक्तदान करताना
भाजपा परिवार मलकापूर 

Post a Comment

أحدث أقدم