मलकापूर : दि 5 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवार दुपारी 2:30 वाजता जागतिक कर्करोग दिनानिमित्त,भारतीय जैन संघटना मलकापूर कडून सुमतीनाथ भवन मलकापूर येथे कर्करोगाविषयी जनजागृती आणि मार्गदर्शनासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात जळगावचे प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अतुलजी भारंबे, प्रसिद्ध केमो सर्जन डॉ. नितीनजी चौधरी आणि आयुष्मान आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेचे राज्य प्रशासक डॉ. आनंदजी जैन यांनी कर्करोगाच्या सर्व पैलूंवर आपले मौल्यवान मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. संदीप नहार, मलकापूर अध्यक्ष श्री. अनिल कोचर, मलकापूर सचिव श्री. पंकज भंडारी, विदर्भ महिला प्रमुख मीना संचेती, मलकापूर महिला अध्यक्ष मीना कोचर, मलकापूर महिला सचिव ज्योत्स्ना संचेती आणि भारतीय जैन संघटना मलकापूरच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
भारतीय जैन संघटना मलकापूर यांच्याकडून कर्करोग विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق