Hanuman Sena News

जैन असोसिएशन ऑफ इंडिया मलकापूर यांच्यातर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त भव्य मार्गदर्शन शिबिर...


 मलकापूर : जैन असोसिएशन ऑफ इंडिया ( बीजेएस ) शाखा मलकापूर अंतर्गत कर्करोग संवाद व शिबिराचे जागृतीसाठी एक महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे दिनांक 5 फेब्रुवारी बुधवार 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता सुमतिनाथ भवन मलकापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी शीर्ष मार्गदर्शक डॉक्टर अतुलजी भारंबे (कर्करोग सर्जन), डॉक्टर नितीनजी चौधरी (कर्करोग तज्ञ जळगाव), डॉक्टर आनंदजी जैन (राज्य प्रशासक) यांची उपस्थिती लाभणार आहे.आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे! कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांबद्दल योग्य माहिती मिळविण्यासाठी या जागरूकता शिबिरात सामील होउन सर्व महिला आणि पुरुषांना या महत्त्वाच्या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याची नम्र विनंती भारतीय जैन संघ शाखा मलकापूर करीत आहे तरी या शिबिराचा  सगळ्यांनी लाभ घ्यावा.

Post a Comment

أحدث أقدم