मलकापुर: महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे. हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो. हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. मलकापूर शिवशक्ती नगर येथील जागृत हनुमान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (ता. २६) महाअभिषेक, पूजा, आरती, ओम नमः शिवाय मंत्र जप, बेल वाहने आदी कार्यक्रम करण्यात आले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आला सामुहिक आरतीचे पुजन 10:30 वाजता करण्यात आले यात महीला वर्गाने उस्फूर्तपणे सहभाग घेतला व पुजनानंतर शिवभक्ताच्या वतीने मंदिरात फराळ व फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या वेळी शिवशक्ती नगर, तुलसी नगर, सरस्वती नगर, नालंदा नगर येथील शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवशक्ती नगर येथील जागृत हनुमान मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त महाआरतीचे सामूहिक पूजन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق