नांदुरा: आजचे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे सृजन नागरिक आहेत.म्हणूनच सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम घडविण्यासाठीची कसरत सुरु असते.वर्षभर अभ्यास करणारे हे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी काही वेळ पुस्तकं बाजूला ठेवतात."अजित कॉन्व्हेंट चांदुर बिस्वा"येथे नव्याने रुजू झालेल्या मुख्याध्यापिका सरिताताई बावस्कार यांच्या मार्गदर्शनात यावर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्नीवल चे आयोजन करण्यात आले. कार्णिवल म्हणजेच विद्यार्थ्यांसाठीचा फेस्टिवल म्हणून या दोन शब्दांचा संयुक्त शब्द म्हणजेच 'कार्नीफेस्ट' असे या कार्नीवलचे नाव.सोमवार दि. २७/०१/२०२५ ते शुक्रवार ३१/०१/२०२५ या पाच दिवसामध्ये हा कार्नीवल घेण्यात आला.यामध्ये सर्व वर्गांसाठी निरनिराळे उपक्रम आणि स्पर्धा घेण्यात आल्या यामधील स्पोर्ट डे,चिमुकल्या विद्यार्थ्यांचा एज्युकेशनल रॅम्प वॉक म्हणजे अल्फा वॉक, इंट्रोडक्शन व स्टोरी टेलिंग कॉम्पिटीशन,विद्यार्थ्यांनी बनवलेली वारली पेंटिंग,फ्लावर डेकोरेशन हे उपक्रम लक्ष वेधणारे व आकर्षक बिंदू ठरले. शेवटचा दिवस आनंदमेला म्हणजेच "विद्यार्थ्यांची खरी कमाई" या उपक्रमाणे संपन्न झाला.यामध्ये प्रत्येक स्पर्धा, उपक्रम प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित पार पडला. प्रत्येक दिवसातील उपक्रमाची सुरुवात ही प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांच्या वेलकम सॉंग आणि स्पीच ने आरंभीत झाला.प्रमुख पाहुणे व विशेष उपस्तिथी शाळेचे अध्यक्ष माननीय ऍड. सुजितभाऊ इंगळे यांची लाभली सोबतच आदरणीय वि.आर पाटील सर, संतोष पाटीलसर,सौ. कोमलताई सचिन तायडे, राजेशजी भागवतसर,रंजनाताई भागवत, दुर्गाताई गायकवाड अनिताताई लांडे,वंदनाताई उंबरकर, भारती मॅडम,पवार सर,दिनेशसर गटमने,अनिलभाऊ सुरळकर, शिंगोटेताई इ.प्रमुख पाहुणे उपस्थित असून प्रमुख पाहुण्यांनी समंध कार्यक्रमाची स्तुती करून आपली प्रतिक्रिया नोंदविली.या कर्णिवल मधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून विद्यार्थ्यांचा कुतूहल दृष्टिकोन वाढेल,आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अश्याच प्रकारचे उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यात आले पाहिजे असे मत व्यक्त करून माननीय व्ही.आर.पाटील सर अध्यक्ष यशवंत विद्यालय,चांदुर बिस्वा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व स्तुती केली.व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सरिताताई बावस्कार तथा समन्वयिका सौ.सुनितासिंग गौर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे नवनवीन उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग,विद्यार्थी व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
अजित कॉन्व्हेंट,चांदुर बिस्वा येथे प्रथमच पार पडलेल्या पाच दिवसीय कार्नीवल ची पंचक्रोशीतील गावांमध्ये पॉसिटीव्ह चर्चेला उधाण...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق