नांदुरा : आजही राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जानारा 'जय हिंद' हा नारा प्रथम देणारे, मोठ्या पदाच्या नोकरीवर पाणी सोडून देशसेवेत वाहून नेणारे , जागतिक स्तरावरून स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न करणारे ,महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस..! तथा महाराष्ट्रातील एक भगवे वादळ, मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारुन मराठी माणसाच्या हितासाठी लढणारे, अखंड हिंदुस्थानाचे कवच कुंडल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती म्हणजेच,२३ जानेवारी होय.सुभाषबाबु यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन वाहून दिले तर बाळासाहेब यांनी हिंदुत्वासाठी, मराठी माणसाच्या हक्कसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मंगळवार दि २३/०१/२०२५ रोजी अशा महान व्यक्तींना शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने नांदुरा खुर्द येथे अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरिता बावस्कार, महिला आघाडी शहर प्रमुख यांनी केले अनिल जांगळे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच बाळासाहेबांसोबतच्या आठवणी अधोरेखित केल्या.शिवसेना शहर, महिला आघाडी, युवासेना उपस्थित सर्व शिवसैनिकांनी या महान पुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यासोबतच सर्वांनी नेताजीं सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या विचारांचे स्मरण करून ते विचार आचरणात आणण्याचा निश्चय केला. यावेळी उपस्थित युवासेना शहर प्रमुख - हरीश काटले, उपशहर प्रमुख महादेव सपकाळ, देवेंद्र जैस्वाल, महेश उंबरकर, शुभम आंबेकर, प्रकाश बावस्कार, श्याम बडवे, शुभम आंबेकर,महिला आघाडी उपशहर प्रमुख, प्रज्ञा तांदळे ,भावना सोनटक्के- सचिव, विजया गोरे, मंगला सपकाळ, शांताबाई सातव, कांताबाई गवई,नेहा मंडवाले, विजया बावणे, लीलाबाई डिवरे,उषा बावस्कार यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची जयंती उत्साहात साजरी..!
Hanuman Sena News
0
إرسال تعليق