Hanuman Sena News

विप्र फाउंडेशन मलकापूर शहर अध्यक्ष पदी मनीष पंडित यांची नियुक्ती...

मलकापुर : आपल्या राष्ट्रीय, धार्मिक एवं सामाजिक कर्तव्यानं प्रति ब्राम्हण समाजस जागृत करण्या करिता  आणि समग्र आर्थिक उन्नती या उद्देशा करिता संपुर्ण देशात समर्पित भावनेने कार्य करणारी संस्था  विप्र फाउंडेशन चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दामोधर पांडे, फाउंडेशन चे जिल्हा अध्यक्ष शैलेश शर्मा व उपाध्यक्ष पंडित सतीश शर्मा यांचे आगमन मलकापूर शहरात झाले, संस्थेच्या मलकापूर शहरात भविष्यातील समाज कार्य संदर्भात एक बैठक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक सुरेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली, या बैठकीत ज्येष्ठ समाजगणांच्या उपस्थितीत मनिष पंडित यांची विप्र फाउंडेशन, मलकापूर च्या शहरअध्यक्ष पदी यावेळी नियुक्ती करण्यात आली! आणि शेष कार्यकारिणी गठीत करण्या संदर्भात श्री. दामोदर जी पांडे यांनी मार्गदर्शन करून फाउंडेशन चा मूळ आधार उन्नत समाज - उन्नत राष्ट्र हे समजावून सांगितले, जिल्हाध्यक्ष  शैलेश शर्मा ह्यांनी समाज आर्थिक रित्या मजबूत करून आपले राष्ट्र कसे कसे सक्षम करता येईल या विषयी चर्चा केली,याप्रसंगी विप्र फाउंडेशन चे जिल्हा मार्गदर्शक मंडळ सदस्य  सुरेश कुमार शर्मा, दामोदर शर्मा, बंडू महाराज,राधेश्याम चौबे, रमेश शर्मा,  हेमंतजी शर्मा, नवलकुमार व्यास, राधेश्याम शर्मा, राजेंद्र शर्मा,रवी शर्मा, हेमंत शर्मा, सुशील शर्मा सह समाज बांधव उपस्थित होते याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देऊन भविष्याच्या समाज कार्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

أحدث أقدم