Hanuman Sena News

नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी शिवसेना नांदुरा शहराचे नगरपालिका येथे निवेदन..!





 नांदूरा: आरोग्य हीच खरी संपत्ती हे आपणा सर्वांनाच ज्ञात आहे आजच्या या धाकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्याचे अत्यंत महत्वाचे ठरते, पाण्याद्वारे आजार पसरण्याचे प्रमाणाची टक्केवारी ही जास्त दिसून येते. परंतु गेल्या कित्तेक वर्षांपासून नांदुरा शहरामधील नांदुरा खुर्द या भागात पाण्याचे शुद्धीकरण न करता विहिरीतील व हापशीवर मोटार पंप बसवून पाण्याचा नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच नांदुरा खुर्दमध्ये एकही पाण्याची टाकी नसल्याकारणाने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हातपंप, बोअरवेल यातील पाण्याची पातळी कमी झाली असून पुरेसा गोड पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत नाही यासोबतच या पाण्यातील क्षारांचे प्रमाणात वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.यामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या अडचणींचा सामना करावा लागत असून आरोग्याच्या घोक्याचे जास्त प्रमाण नागरिकांसमोर उभे असल्याचे दिसते.बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल पडण्याची समस्या ही नांदुरा तालुक्यासह शेजारील तालुक्यात देखील आढळून आली आहे. ही समस्या देखील अशुद्ध पाण्यामुळे म्हणजेच पाण्यामधून जिवाणूचे संक्रमण केल्याचे उघड झाले आहे म्हणून नांदुरा खुर्द येथे ही समस्या उद्भवन्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदुरा खुर्द येथे नकरिकांना असणाऱ्या या संभाव्य धोका संपुष्टात आणुन शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, तथा स्वतंत्र पाण्याची टाकी उपलब्ध करण्यात यावी करिता नांदुरा शहराच्या वतीने  शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने नगरपालिका, नांदुरा येथे निवेदन देण्यात आले. तसेच नागरिकांच्या आरोग्याबद्दल जागृती न दाखवील्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला.शिवसेना या संघटनेचे युवा सेना शहर प्रमुख हरीश काटले, सौ सरिताताई बावस्कार,महिला आघाडी शहर प्रमुख,सौ. प्रज्ञाताई तांदळे,महिला आघाडी उपशहर प्रमुख.जितेंद्र जुनगडे शहर संघटक,संजय मेहसरे उपशहर प्रमुख,महादेव सपकाळ उपशहर प्रमुख,देवेंद्र जैस्वाल शहर सचिव,शुभम राठी  युवा शहर सचिव,शुभम ढवळे,संभाजी वसे विभाग प्रमुख,शाखा प्रमुख रवी मात्रे, महेश उंबरकर, कृष्णा इंगळे, प्रकाश बावस्कार बळीराम इंगळे,नांदुरा खुर्द मधील नागरिकांच्या व इतर शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم