Hanuman Sena News

मलकापुरात गो तस्करीचे प्रमाण वाढले ; गोवंश मालक दहशतीत




 मलकापूर: शहरात गौवंश तस्कर व मध्यरात्री गोवंश चोरीचे प्रमाण दिवसेदिवस दिवस वाढत आहे. या कारणाने मलकापूर तालुक्यातील गोवंश मालक यांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
अशीच एक घटना दिनांक 21 जानेवारी रोजी शहरात मध्य भागी जाधववाडी येथील संजय निनाजी ढोले यांच्या गोठ्यातून रात्री 10 वा घडली. तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या 3 गोवंश गाडी मध्ये कोंबून नेऊन चोरीची घटना घडली आहे.यांची मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ढोले यांनी तक्रार दाखल केली आहे.शेकडो गोवंश चोरीच्या तक्रारी दाखल असूनही चोरीला गेलेले गोवंश पुन्हा सापडत नाही असा नेहमीचा अनुभव   मालकांनी व्यक्त केला आहे.देशात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना ही मलकापूर शहरात गोवंश अवैध तस्करी चे प्रमान वृध्दी दाखल घालेल्या पोलिश तक्रारीचे सिद्ध होत आहे.या विषयावर मलकापुर मधिल हिदूत्ववादी संघटनेने वारंवार पोलिश स्टेशन, मलकापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देउन सूचित केले आहे आणि अवैध गो तस्करी बाबत गो स्कोड निर्मिती करतात ही विनंती केली होती.मागील महा मध्ये लोकप्रतिनिधी यांच्या व्दारे आयोजित जनता दरबार मध्ये हा विषय हिंदूत्ववादी संघटने द्वारा मांडला होते.

Post a Comment

أحدث أقدم