मलकापूर :राज्यस्तरीय कुणबी - मराठा समाजाचा भव्य दिव्य वधू वर परिचय मेळावा घेण्याच्या अनुषंगाने आज 19 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह मलकापूर येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अमोल भाऊ टप यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवा पाटील गोंडयांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले लग्न जोड पद्धतीमध्ये पारंपारिक पद्धतीसह आधुनिक पद्धतीचा अवलंब करून अधिकाधिक सोयीस्कर पद्धतीने सोयरीक जुडावी याकरिता सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन भव्य दिव्य असा वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्याबाबतचे निर्देश सकल समाज बांधवांना यावेळी देण्यात आले.जेणेकरून वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय टाळून समाज एक संघटित होण्यास मदत होईल.याबाबत त्वरित ग्राम पातळीवर व शहरी विभागात वेगवेगळ्या आयोजन समित्या निर्माण करून सर्वसामान्य मराठा कुणबी बांधवांपर्यंत पोहोचून जनजागृती करत आधुनिक पद्धतीबाबत किंबहुना वधू-वर परिचय मेळाव्या बाबत अवगत करून लवकरात लवकर भव्य दिव्य असा राज्यस्तरीय वधू वर परिचय महामेळावा याची निर्मिती करावी अशा जाहीर सूचना देण्यात आल्या यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवा पाटील गोंड, प्रदेश सचिव श्री प्रवीण भाऊ कान्हे, जिल्हाध्यक्ष श्री अमोल भाऊ टप, संभाजी ब्रिगेड तालुक्का अध्यक्ष श्री राहुल भाऊ संबारे, अनिल भाऊ सरप, महादेव पवार, किसनराव कंकाळे, रामदास रोठे, विठ्ठल गावंडे, सचिन गायकवाड, वैभव पाटील, सुनिल बाबुराव संबारे, चंद्रकांत गावंडे, शरद मोरखेडे, तुकाराम कापडे, युवराज माताडे, यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
राज्यस्तरीय कुणबी-मराठा समाजाची मलकापुर येथे शासकीय विश्रामगृहात पार पडली महत्वाची बैठक
Hanuman Sena News
0
إرسال تعليق