Hanuman Sena News

मलकापूर मध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा वर्षपूर्ती हर्ष उल्हासात साजरी...




मलकापूर : शतकानुशतके त्याग, तपश्चर्या आणि असंख्य राम भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरातील प्रभू श्री रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा समारोह यास एक वर्षपूर्ती तिथी अनुसार पौष शुक्ल द्वादशी,शनिवार, 11 जानेवारी 2025 रोजी झाली यानिमित्त मलकापूर शहरातील विवध श्रीराम मंदिर येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण तसेच आरतीचे आयोजन करण्यात आले सायंकाळी दीपमाला लाऊन मंदिर सजवण्यात आले सर्व राम भक्त यांनी या आरतीचा व प्रसाद लाभ घेऊन प्रभू श्रीराम यांचे आशीर्वाद घेतले.आज पासून 1 वर्ष पूर्वी 500 वर्षाचा वनवास संपून अनेक कार सेवक हजारो राम भक्त प्रेमी यांचे बलिदान साधू संताचे संघर्ष , न्यायालयीन प्रक्रिया यातून निघून असत्यावर सत्याची विजय होऊन राम लला अयोध्येत अवश्य शुक्ल द्वादशीला विराजमान झाले होते यावेळेस भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित नव्हे तर पूर्ण विश्वभर साजरा झाला होता ज्याप्रकारे दिवाळी साजरी होते त्याच प्रकारे यावेळी दिवाळी सारखे वातावरण संपूर्ण देशात झाले होते. याचीच पुनरावृत्ती चे दर्शन काल मलकापूर मधील सर्व राम मंदिर येथे घडून आले मलकापूर शहरातील पारपेठ श्रीराम मंदिर, गाढेगाव श्री राम मंदिर येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण करून आरतीच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील सर्व रामभक्त प्रतिष्ठित मंडळी राजकीय पक्षाचे पुढारी उपस्थित होते यावेळेस उपस्थित श्री राम भक्त मंडळी यांना विश्व हिंदू परिषद सत्संग प्रमुख ह.भ.प कीर्तनकार संजय महाराज घोडके यांनी या दिवसाचे महत्त्व बाबत संबोधन केले आजच्या या कलियुगात आदर्श पुरुष कसा असावा याचे प्रेरणा रामचरितमानस मधून घ्यावें व आज व येणाऱ्या 21 जानेवारी रोजी हा उत्सव दिवाळी सारखा साजरा करावा असे प्रतिपादन केले.

Post a Comment

أحدث أقدم