Hanuman Sena News

आदर्श प्राथमिक विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न...


मलकापूर : सर्व विद्यार्थी व पालक ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा आदर्श प्राथमिक विद्यालय, मलकापूर चा सांस्कृतिक महोत्सव दिनांक 27 आणि 28 डिसेंबर रोजी अतिशय उत्साहात व दिमाखात पार पडला. दिनांक 27 डिसेंबर रोजी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाला मलकापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री एन जे फाळके साहेब, नगरसंघचालक श्री दामोदर जी लखानी, नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे मलकापूर शाखेचे अध्यक्ष श्री संजय जी चांडक, श्री संदीप गावंडे संपादक दैनिक आधारस्तंभ तसेच मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी माननीय फाळके साहेब, नगरसंघचालक दामोदरजी लखानी आणि श्री संदीप गावंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच दिनांक 28 डिसेंबर रोजी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन श्री संजय पाटील व्यावसायिक, सौ स्मिता पाटील, तसेच श्री गिरीश वैद्य उपप्राचार्य लि.भो. चांडक विद्यालय, मलकापूर यांच्या हस्ते पार पडले.सांस्कृतिक महोत्सवाच्या च्या दोन्ही दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला. ज्यात नाट्य,नृत्य,गायन,वादन अशा सुप्त  कलागुणांचा समावेश होता. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण शाळेच्या यूट्यूब चैनल वर करण्यात आले.अनेक पालकांनी कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण बघून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी खूप परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم