Hanuman Sena News

शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड मलकापुर च्या कार्यकारी अभियंता यांना घेराव घालत दिला तिव्र आंदोलनाचा ईशारा...




मलकापूर : संभाजी ब्रिगेड तालुका कार्यकारणी व कार्यकर्ते यांचा संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत बेलाड येथील गट नं. 174 श्रीक्रुष्ण  जगन्नाथ संबारे यांच्या शेतातील डिपी सहा महिन्या अगोदर आलेल्या वारा उधान (चक्रिवादळ) पावसामुळे पडली असुन  सदर शेतातील विदुत प्रवाह खुप दिवसापासून खंडीत झाला आहे.तरी या संदर्भात श्रीक्रुष्ण  जगन्नाथ संबारे या शेतकर्याने वारंवार निवेदन देवून मा.शाखा अभियंता यांना कळविले आहे.मात्र अद्याप पर्यंत या संदर्भात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेड मार्फत संबंधित शेतकऱ्यांचा होत असलेला त्रास लक्षात घेता आपण त्वरीत डि.पी.दुरुस्ती कींवा नवीन देवून शेतकर्यांना सहकार्य करावे अन्यथा संभाजी ब्रिगेड मलकापुर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परीणामांना सर्वस्वी महावितरण जबाबदार राहिल असे निवेदन देण्यात आले या वेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे, संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनिल संबारे, संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष राहुल यादगिरे ,तालुका कार्याध्यक्ष पवन संबारे, बेलाड शाखा अध्यक्ष गजानन संबारे, बेलाड ग्रामपंचात सदस्य ईच्छाराम संबारे, माधव रत्नपारखी,गणेश सोनुने, दिपक निबोळकर, मंगेश संबारे, अभिषेक संबारे, गणेश दहिभाते, गणेश संबारे,श्रीक्रुष्ण संबारे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم