मलकापूर: नगर सेवा समिती मलकापूर संचलित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयात संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 20 डिसेंबर 2024 रोजी पोस्टर मेकिंग व स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विज्ञान शिक्षिका सौ. राजश्री कुसुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांच्या हस्ते संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यांनी गाडगे बाबांच्या जीवनातील साधेपणा, स्वच्छतेचे महत्त्व व समाजसेवेचे आदर्श यावर प्रेरणादायी विचार व्यक्त केले.त्याचबरोबर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. पोस्टर मेकिंग स्पर्धेत कु. रिद्धी नरवाडे, कु. भूमी गुजरे, कु. आरोही पाटील, कु. अंकिता ठाकूर, कु. तृप्ती शेलकर, कु. अंकिता लोणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्लोगन स्पर्धेत प्रेमराज खोंदले, कु. अर्णवी सूतवणे, कु. श्रावणी चौथे, सार्थक तडके या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.'व्यसनधीनतेचे परिणाम' या गंभीर व सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेतून समाजाला प्रबोधनाचा संदेश दिला. त्यांनी तयार केलेल्या पोस्टर व आकर्षक स्लोगनमधून व्यसनधीनतेचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर व स्लोगनची शाळेत आकर्षक प्रदर्शनी लावण्यात आली. या प्रदर्शनाने पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली आणि त्यांनी सकारात्मक जीवनमूल्यांची शिकवण आत्मसात केली.कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व रुजवणे व समाजाप्रती जबाबदारीची भावना जागवणे असे होते. संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छता, शिस्त व समाजसेवेच्या विचारांना अधोरेखित करत विद्यार्थ्यांना त्यांचे आदर्श जीवन पटवून देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली असून, त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल करण्याचा निर्धार केला.
"व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणारी पोस्टर व स्लोगन स्पर्धा चांडक विद्यालयात संपन्न"...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق