मलकापूर : बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे लोकप्रिय युवा सरपंच संतोष पंडितराव देशमुख मराठा आंदोलक यांची दिनांक 9-12-2024 रोजी अपहरण करुन अमानुष पणे हत्या करण्यात आली त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला आहे व नागरिकांमधून संताप व्यक्त केल्या जात आहे.या घटनेमुळे महाराष्ट्राचे वातावरण बिघडू नये व गावागावात शांतता रहावि या करीता या गुन्हयामधे सहभागी असलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या हत्तेचा तपास जलद गतीने न्यायालयामार्फत करण्यात यावा.संबंधित (मास्टर माईंड) यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन केल्या जाईल व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाचि राहील. असे ननिवेदन राहुल संबारे संभाजी ब्रिगेड मलकापुर तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे, संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनिल संबारे, तालुका संपर्क प्रमुख पवन संबारे,गणेश सोनोने ,दिपक निबोळकर,राहुल यादगीरे ,अभिषेक संबारे,सुरज तायडे,कार्तिक हळदे,ऋषिकेश मांडवकर,चेतन मुडाळे,सोमनाथ राखोंडे , महादेव संबारे,गणेश दहिभाते या सह असंख्य संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.
बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांना तत्काळ न्याय द्या अन्यथा राहुल भिमराव संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष मलकापूर यांचा महाराष्ट्र शासनाला तिव्र आंदोलनाचा ईशारा...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق