मलकापूर : येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी सकाळी महिला तक्रार निवारण समितीअंतर्गत मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्याकरिता स्त्रीरोग व प्रसूती रोगतज्ज्ञ डॉ. छाया देशमुख यांची उपस्थिती होती. त्यांनी मुलींना शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य कसे उत्तम प्रकारे सांभाळले जाईल याविषयी माहिती दिली. यात त्यांनी मुलींना असणाऱ्या शारीरिक प्रश्नांविषयी सखोल मार्गदर्शन केले. पीसीओएस व पीसीओडी या मुलींच्या शारीरिक समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली, तसेच किशोरवयीन मुलींचा आहार, त्यांचा शारीरिक व्यायाम व मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचारसरणी कशी असावी याबाबतही मुलींना मार्गदर्शन केले. विविध शारीरिक समस्यांबाबत मुलींकडून आलेल्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करून मुलींच्या मनातील शंकांचे निरसन डॉ. छाया देशमुख यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले. कार्यक्रमाला प्रा. पल्लवी चौधरी, प्रा. लता लढे, प्रा. शारदा खर्चे यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील सर्व विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
إرسال تعليق