मलकापूर -बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्यांकांवर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून महिलांवर होणारे हल्ले, खून, लूटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचार हे अत्यंत चिंताजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दु परीषद या अमानवीय कृत्याचे जाहीर निषेध आज मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया येथे निवेदन देउन दर्शवले.मलकापूर उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या द्वारे देशातील मा.गृहमंत्री यांना एक निवेदन देण्यात आले त्यात नुमद करन्यात आले की सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा हे थांबवण्याऐवजी केवळ मूक प्रेक्षक बनले आहेत. बळजबरीने बांगलादेशातील हिंदूंच्या आत्मसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठवलेला आवाज दाबून टाकण्यासाठी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराचे नवे पर्व सुरू होत असल्याचे दिसते.अशा शांततापूर्ण आंदोलनात हिंदूंचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉन साधू चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात पाठवणे ते इथेच थांबले नाहि तर काल भिक्षू रामदासजी प्रभू यांना ही तुरुंगात डांबण्यात आले हे कृत्य बांगलादेश सरकारचे अन्यायकारक आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि श्री चिन्मय कृष्ण दास व रामदास प्रभु यांची तुरुंगातून सुटका करावी, या करिता भारत सरकार ने त्वरित पाऊल उचलावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दु परीषद, बजरंगदल,सकल हिन्दु समाज द्वारे केलें आहे.बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्याच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर उचलावीत, असे आवाहनही भारत सरकारला केले आहे.या नाजूक वेळी, भारत आणि जागतिक समुदाय आणि संघटनांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे समर्थन व्यक्त केले पाहिजे आणि जागतिक शांतता आणि बंधुता यासाठी आपापल्या सरकारांकडून शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे अशी मागणी या निवेदन द्वारे केले आहे सदर निवेदन प्रतीलिपी भारत देशाच्या राष्ट्रपती महोदया व जिल्हा अधिकारी साहेब यांना ही देण्यांत आले आहे.या वेळी मोठ्या संख्येत मलकापूर शहरातील हिंदु बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार तात्काळ थांबवण्याकरिता गृहमंत्री यांनी पाऊल उचलावे...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق