नांदुरा:आपल्या भारत देशाची लोकशाही हि पावर असुन मतदान ही सुपर पावर आहे. जनतेचे हित जनणारा, देशाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगुन ते सत्यात इतरविणारा जनतेच्या मनातील नेता निवडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झालेला आहे. संपूर्ण राज्यभरात महायुतीला भरभरून मतांच्या रूपात जनतेचे प्रेम व विश्वास मिळाल्याचे चित्र आपण बघत आहोत.मलकापुर मतदार संघात ज्यांनी २५ वर्ष आमदार म्हणून जनतेची सेवेसाठी दिले असे दिलखुलास व्यक्तिमत्व श्री. चैनसूखभाऊ संचेती यांना जनतेने तसेच लाडक्या बहिणींने भावाला आशिर्वाद व प्रेम रुपी मतांची पावती देऊन विजयी केलेले आहे. याचा आनंद सर्वत्र साजरा होताना दिसत आहे. नांदुरा शहरा मधे शिवसेना, महिला आघाडी, युवासेना,तसेच भाजपा व सर्व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जे अथक परिश्रम घेतले. त्याचे फळ म्हणून महायुतीचा नेता आज प्रचंड मतांनी निवडून आलेला आहे. शनिवार दि. २३/११/२०२४ रोजी शिवसेना शहर प्रमुख, नांदुरा अनिल जांगळे यांच्या नेतृत्वात महिला आघाडीने हर्ष - उल्हासाने जल्लोष करत हा महाविजय साजरा केला. सौ. सरिता बावस्कार महिला आघाडी शहर प्रमुख यांनी सर्व महिलांच्या वतीने चैनूभाऊ यांना शुभेच्छा देऊन आनंद, उत्साह प्रगट केला,व फटाके फोडून, नारे दिले गुलाल उधळण्यात आला. उपस्थित सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले.सर्व वातावरण आनंददायी व उत्साहित होते. यावेळी श्री. दत्ताभाऊ सुपे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, नांदुरा अर्बन बँक,उपाध्यक्ष, श्री. लक्ष्मण झांबरे,- भाजपा नेते, सौ. प्रज्ञा तांदळे शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख, सौ. भावना सोनटक्के, महिला आघाडी सचिव, दिनेश कोठारी, १२६ बुध प्रमुख भाजपा, मंगला सपकाळ, ज्योती कारांगळे, पोरस राखोंडे, आशिष बडवे, वसंता नारखेडे, प्रकाश बावस्कार व इतर अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
चैनूभाऊंचा विजय शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहराकडून हर्षोउल्हासाने व मिठाई वाटप करून साजरा...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق