मलकापूर : मलकापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ पिपल्स रिपब्लीकन पार्टी मलकापूर तालुकाच्या वतीने स्थानिक चैनसुख संचेती यांच्या कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी आमदार चैनसुख संचेती यांना बहुमताने निवडून देण्यात यावे, असे आवाहन पिरीपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांनी केले याबाबत अधिक माहिती अशी की, १३ नोव्हेंबर रोजी आ. चैनसुख संचेती यांच्या कार्यालयात पिरिपाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार चैनसुख संचेती, पिरिपा जिल्हा उपाध्यक्ष गजाननदादा तायडे, तालुकाध्यक्ष गणेश झनके, रवि वाकोडे आदी उपस्थित होते. यावेळी मा. आ. चैनसुख संचेती यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझ्या २५ वर्षाच्या काळात मी अनेक कामे ही बौध्द समाजाची केली आहे. यावेळी सुध्दा मलकापूर शहरात बाबासाहेब आंबेडकरांचे भव्यदिव्य असे स्मारक व मुलींसाठी वसतीगृह व बौध्द समाजासाठी समाज हॉल ही समाजाची असलेली मागणी पुर्ण करण्याचे प्रयत्न करेल. यावेळी कार्यक्रमाला पिरिपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चैनसुख संचेती यांना बहुमताने निवडून द्याव पिरिपा मेळाव्यात राजाभाऊ सावळे यांचे आवाहन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق