Hanuman Sena News

रंगीबेरंगी,नक्षीदार पणत्यांनी सजली बाजारपेठ !


मलकापुर : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेत आकर्षक आकाश कंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य अशा अनेक वस्तूंची आवक झाली आहे.मलकापुर येथील प्रमुख बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावर आकर्षक, रंगीबेरंगी आणि नक्षीदार पणत्यांनी बाजारपेठ सजली आहे. याठिकाणी पणत्यांचे १०० पेक्षा अधिक प्रकार उपलब्ध आहेत. दिवाळी जवळ आली की लगबग सुरू होते सजावटीची. प्रत्येकवर्षी सजावटीच्या वस्तूंमध्ये नवनवीन वस्तूंची भर पडत असते. सजावटीत एक आकर्षक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवे, पणत्या रंगवून त्यांची विक्री किंवा भेट देण्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये वाढती क्रेझ आहे पूर्वी मातीच्या पणत्या जास्त वापरल्या जायच्या; परंतु आता त्यात नवीन पद्धती आल्या आणि त्यातून नवनवीन प्रकार बाजारात आले.सध्या पणत्या 'पीओपी'पासून बनत आहेत. तथापि, गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी जास्त दर वाढलेले नाहीत. डिझायनर पणत्यांची क्रेझ कायम असून, पूर्वी केवळ मातीपासून बनवलेल्या पणत्या दारात लावल्या जायच्या. सुरेख रंग, लेस, कुंदनसह आकर्षक डिझाइन केली जाते. अशा पणत्या ग्राहकांच्या जास्त पसंतीस पडत आहेत.आकर्षण रंगीबेरंगी पणत्यांसोबतच मेणाचे दिवेही बाजारात दाखल झाले आहेत. रेडिमेड असलेल्या या दिव्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी होत मातीच्या पणत्यांना जास्त मागणी होती; पण काळानुसार आता ओ. पी. आणि डिझायनर आकर्षक पणत्यांची क्रेझ वाढली आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात मागणी करतात. पणत्या, बोळके आणि मूर्तीशिवाय इतर मातीच्या भांड्यांचीही दिवाळीत मोठी मागणी असते.

Post a Comment

أحدث أقدم