Hanuman Sena News

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ:नामांकनासाठी सहा तर प्रचाराला तेरा दिवस

 मलकापूर,:  विधानसभा निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे दरम्यान शनिवार व रविवार अशा दोन सुट्ट्या असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सहा दिवस मिळणार आहेत त्यामुळे 28 व 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यानंतर प्रचारासाठी केवळ 13 दिवस असल्याने मतदार पर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराची चांगली धावपळ होऊ शकते निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबरला जाहीर केला तेव्हापासून इच्छुकांमध्ये धावपळ सुरू झाली विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बुलढाणा चिखली मेहकर सिनखेडराजा खामगाव जळगाव जामोद मलकापूर मतदारसंघात 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे 26 ला चौथा शनिवार तर 27 ला रविवार असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ सहा दिवस मिळतील चार नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत त्या दिवशी निवडणूक रिंगणात असलेला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल शिवाय त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहेत त्यानंतर निवडणूक प्रचाराला खुल्या अर्थाने सुरुवात होणार आहे 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यापूर्वी 18 नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावतील त्यामुळे प्रचारासाठी उमेदवारांना केवळ तेरा दिवस मिळणार आहेत विधानसभा निवडणूक कार्यक्रमांनुसार 22 ते 29 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणुकीचे नामनिर्देश पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येथील 30 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता नामनिर्देश पत्राची छाननी करण्यात येईल 4 नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विवक्षित कृतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा नियंत्रण मदत आणि तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे हा कक्ष 24 तास कार्यान्वित राहणार आहे

Post a Comment

أحدث أقدم