Hanuman Sena News

मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी मलकापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल...



 मलकापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्षे सप्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.व्ही. जाधव यांनी हा निर्णय दिला सन 2018 मध्ये घडलेल्या घटनेचा शहर पोलीसात तक्रार देण्यात आली होती. त्यामध्ये शहरातील तेरा वर्षीय मुलगी टीव्हीचा रिमोट आणण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपी संजय पुंजाजी इंगळे यांनी रिमोट देतो म्हणत एका मंदिरामागे घेऊन गेला व तिचा विनयभंग केला. मुलीने हाताला चावा घेत आरोपीच्या तावडीतून सुटका केली. तसेच यावेळी तिला घराजवळील व्यक्ती जाताना दिसली. तिने आरडाओरडा करत त्याला आवाज दिला त्या व्यक्तीने आरोपीच्या ताब्यातून मुलीला सोडविले. घरी पोचल्यावर मुलीने आईला माहिती सांगितली पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शुभांगी पाटील व संजीवनी पुंडगे यांनी केला. तपासाअती जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विवेक बापट यांनी युक्तिवाद केला. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 8 नुसार आरोपी संजय इंगळे याला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सात दिवसांची सप्त मजुरी, तसेच कलम 12 अन्वये एक वर्ष सप्त मजुरी, कलम 354 नुसार एक वर्ष सत्ता मजुरी, कलम 354 ब नुसार तीन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा आरोपीला ठोठावली आहे. सर्व शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. दंडाची चार हजाराची रक्कम पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Post a Comment

أحدث أقدم