Hanuman Sena News

चांडक विद्यालयाला बॉल बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश...


मलकापुर: बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने,तसेच बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मलकापूर येथील यशोधाम पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार पडल्या. विविध तालुक्यांमधून अनेक संघांनी या स्पर्धेत भाग घेतला.लीलाधर भोजराज चांडक महाविद्यालयाच्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने शेगाव येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर संघाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीत त्यांनी यशोधाम संघाला पराजित करत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, 17 वर्षांखालील मुलांच्या संघानेही अप्रतिम खेळ दाखवत शेगावच्या माऊली स्कूल ऑफ स्कॉलरसारख्या संघांना हरवून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही संघांना विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. जयंत राजुरकर आणि संचालक मंडळाने केले. विजय पळसकर, राजुभाऊ खंगार, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक श्री. गाढे सर, वराडे सर, आणि नवले सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. लोकेश चांडक, सौरव दिवाणे, अक्षय चव्हाण, गोपाल चव्हाण, नवनीत तेजेकर, आणि सुमित भोसले यांनीही संघाला महत्त्वाचे सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم