मलकापुर: स्थानिक आदर्श प्राथमिक विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री घोटी सर हे उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकणारी सुंदर भाषणे सादर केली.गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांनी स्वावलंबन, स्वयंशिस्त, स्वच्छता, सत्य या चतुर्मुत्रिवर आधारित सुंदर नाटिका याप्रसंगी सादर केली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात गांधीजींच्या अहिंसा या तत्वाचा जगभर कशाप्रकारे स्वीकार केला जात आहे याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील मॅडम तसेच आभार प्रदर्शन श्री विनोद रामेकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय चव्हाण तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
आदर्श प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق