Hanuman Sena News

अवघ्या दीड महिन्यात 5 हप्त्यांचे 7500 रु लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा...



 मलकापुर : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात आणि तीन टप्प्यात जुलै ते नोव्हेंबर या पाच हप्त्यांचे 7500 रुपये रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. तथापि काहीच दिवसाच्या अंतराने मोबाईलवर पैशाचे एसएमएस धडकत असल्याने विशेषता गरीब कुटुंबातील कष्टकरी महिलांचे चेहरे फुलले असून त्यांच्या घरात आनंदाची साखर पेरणी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शासनाकडून जुलै महिन्यात महिलांसाठी 'मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण' योजना करण्यात आली. योजने करिता पात्र ठरणाऱ्या प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात महिन्याला 1500 रुपये शासनाकडून जमा केले जातील असे जाहीर करण्यात आले. त्यानुसार राज्यभरातील महिलांनी प्रतिसाद देत उस्फुर्तपणे अर्ज केले. शासनाने दिलेल्या शब्द पाडत योजनेअंतर्गत पहिल्या दोन हप्त्याचे 3000 रू रक्कम 17 व 31 ऑगस्टला बँक खात्यामध्ये जमा केली. तसेच नव्याने अर्ज करणाऱ्या महिलांसह आधीच्या सर्व महिलांना पंधराशे रुपयांचा तिसरा हप्ता अदा करण्यात आला. आता दोन महिने काही मिळणार नाही असे वाटत असताना शासनाने 5 ऑक्टोबर पासून पुन्हा लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजाराची रक्कम जमा करणे सुरू केले. यामुळे विशेषता कष्टकरी महिलांचे चेहरे फुलले असून शासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. संघर्षमय आयुष्याच्या वाटेवर पैसा अभावी लोकांना दोन वेळा जेवणही मिळत नाही. शरीर झाकण्यासाठी लागणारे कपडे मिळणे ही अनेकांसाठी कठीण आहे. अशा स्थितीत लाडके बहीण योजनेअंतर्गत दीड महिन्याला 7500 रुपयाची ची मदत प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झाली त्यातून कुणी घरात किराणा भरत आहे तर कोणी मुलांसाठी नवीन कपडे खरेदी करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Post a Comment

أحدث أقدم