मलकापूर : श्री गणेशाच्या उत्सवाला शनिवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. बाप्पाच्या प्रतिष्ठापणे नंतर रविवारपासून ठीक ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान भाविकात व बाजारात नवचैतन्य संचारले असून बाप्पाच्या आगमनाने रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. व्यवसायिक, वाजंत्री ,मंडप डेकोरेशन, फळ विक्रेते, फुल विक्रेते, केटर्स आचारी ,पुरोहित व्यस्त आहेत त्याच वेळी गौरी गणपतीमुळे बाजारात भाविकांची विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येते गणेशोत्सवाला सुरुवात होऊन पाच दिवस लोटले आहेत. या दिवसात अनेकांना रोजगार मिळाला असून लाखोंची उलाढाल होत आहे. गणेश उत्सव अर्थ प्राप्तीचे साधन असून या उत्सवात अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता दोन पैसे गाठीशी बांधता यावेत यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. आगामी पाच दिवसात आणि त्यानंतर दोन-तीन दिवस गणेशोत्सवाचे महाप्रसाद सुरू राहणार आहेत. त्यामुळे आचारी कॅटर्स यांना बऱ्याचपैकी रोजगार मिळणार असल्याची आशा आहे. गणेश उत्सवानिमित्त मोदक लाडू यासोबत केळी आणि इतर साहित्याचा वापर वाढला आहे.त्यामुळे मिठाईच्या दुकानात विविध पदार्थाची विक्री वाढली आहे. सन - उत्सवामुळे तूर्तास रोजगाराची समस्या मिटली असून बऱ्याच पैकी रोजगार मिळत आहे.
गणेश उत्सवातून वाढला रोजगार ; विविध ठिकाणी बाजारात लाखोंची उलाढाल...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق