Hanuman Sena News

दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मलकापूर तालुका व शहर कार्यकारणी जाहीर...

मलकापूर: दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मलकापूर तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यास अनुषंगाने मलकापूर तालुका अध्यक्षपदी रवींद्र जंगले यांची निवड तर मलकापूर शहर प्रमुख पदी सुनील इंगळे, महिला शहर प्रमुख पदी पूनम भारंबे, तसेच बेलाड शाखा प्रमुख पदी निलेश संभारे, उपप्रमुख पदी संतोष इंगळे, सचिव पदी गंगाधर डांबरे, सहसचिव पदी विष्णू संभारे, कोषाध्यक्षपदी पदमाकर संभारे यांची निवड करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी भावी वाटचालीस पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.तसेच त्या अनुषंगाने गावातील ग्रामपंचायत दिव्यांगाच्या 5% निधी बाबत चर्चा करून तात्काळ दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी ग्रामसेवक यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधून त्यांनी सांगितले लवकरच दिव्यांगाचा 5% टक्के निधी वाटप करण्यात येईल असे सांगण्यात आले.तर त्यावेळी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे, रवींद्र जंगले, सुनील इंगळे, निलेश संभारे, संतोष इंगळे, गंगाधर डांबरे, विष्णू संभारे, पदमाकर संभारे, अमर सालवानी, पुनम भारंबे महिला शहरप्रमुख, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم