राज्य शासनाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत ऑटो रिक्षा चालकांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.त्यासाठी नोंदणी, ओळखपत्र आणि सभासद होण्यासाठी शुल्कापोटी 800 रुपयांचा भुदंडऀ सहन करावा लागत आहे. यामुळे रिक्षा चालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या मंडळामार्फत ऑटो रिक्षा आणि मिटडऀ टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंडळामार्फत जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा व मिटडऀ टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजना अंतर्गत सानुग्रह अनुदान नवीन ऑटो रिक्षा मीटडऀ टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी कर्ज आधी योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी परिवाहन विभागाने रिक्षा चालकांनी नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. अर्जदाराकडे ऑटो रिक्षा व टॅक्सी बॅज, लायसन्स व परवाना असणे आवश्यक असून अर्जाचे नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम 500 रुपये व वार्षिक सभासद शुल्क 300 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. त्यानंतरच कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या लाभासाठी ऑटोरिक्षा चालकांना सभासद नोंदणी आवश्यक...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق