मलकापूर: दि. 30/09/2024 रोजी स्वराज्य वाहन चालक संघटनेतर्फे, संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष रविभाऊ वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य वाहन चालक संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने रविभाऊ वाकोडे विदर्भ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,गजानन भगत प्रदेश सचिव विदर्भ,आकाश भाऊ वानखडे जिल्हाध्यक्ष बुलढाणा पंकज खोटाळे (पाटील) उपाध्यक्ष बुलढाणा विजय खराडे तालुका उप प्रमुख मलकापूर,श्याम भाऊ खरात शहराध्यक्ष मलकापूर, विशाल भाऊ गायकवाड सचिव मलकापूर तसेच आशिष भाऊ रानडे कोषाध्यक्ष मलकापूर तालुका व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सर्व वाहन चालक यांना कल्याणकारी महामंडळामध्ये समाविष्ट करणे व इतर रास्त मागण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांप्रमाणे समाविष्ट करून न्याय देण्याची विनंती करण्यात आली तसेच चालकांना अपघाती मृत्यू विमा योजना, अपघाती अपंग विमा योजना, वार्षिक मेडिक्लेम योजना, मुलांचे मोफत शिक्षण योजना, महिलांना गृह उद्योग योजना, जिल्हा,तालुका, शहर या ठिकाणी विश्रामगृहनिर्माण योजना, उद्योगासाठी कमी व्याजदरात कर्ज योजना, स्थानिक शहरात स्टॅन्ड निर्माण योजना, सरकारी कचेरीमध्ये उद्योग उपलब्ध करून देणे बाबत योजना, वय वर्ष 60 झालेल्या चालकांना पेन्शन योजना अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी स्वराज्य वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
स्वराज्य वाहन चालक संघटनेतर्फे विविध मागण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق