Hanuman Sena News

वानराचा अपघातात मृत्यू; हनुमान सेनेच्या कार्यकर्त्यांनी वानराला विधिवत अंत्यसंस्कार करत दिला निरोप...


मलकापूर: हिंदू धर्मात हनुमानाचा अवतार अशी धारणा असलेल्या वानराचा चार चाकी वाहनाच्या धडकेत धरणगाव येथे मृत्यू झाला.धरणगाव येथील हनुमान सेनेच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी या वानराची विधीवत अंत्ययात्रा काढत अंत्यसंस्कार केले.वाहनाची धडक बसल्यानंतर वानर काही वेळ जिवंत होते.नागरिकांनी धाव घेत या वानराला पाणीदेखील पाजलं मात्र दुर्दैवाने या वानराला वाचवण्यात अपयश आले. वानराचा मृत्यू झाल्याने हनुमान सेनेच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी एकत्रित येत या वानराचा अंत्यविधी विधीवत अंत्यसंस्कार केला यावेळी हनुमान सेनेचे सचिन मोळे, निवृत्ती कवळे,वामन कवळे, अमोल पाटील, अमोल मोरे, प्रशांत पाटील व समस्त गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم