Hanuman Sena News

चांडक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक संदेशाची वाहतूक जनजागृती...


मलकापूर: शनिवार, 29 सप्टेंबर 2024 रोजी नगर सेवा समिती द्वारा संचालित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयाच्या स्काऊट-गाईड पथकाने शहरात एक अभिनव समाजप्रबोधन उपक्रम राबवला. तहसील चौक आणि हनुमान चौक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांची जनजागृती केली. यामध्ये विशेषतः हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.या उपक्रमाचा मुख्य भाग म्हणजे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये नियमांचे पालन करण्याची भावना अधिक दृढ झाली. शहरातील रहिवाशांनी या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.स्काऊट-गाईड पथकाचे प्रशिक्षक स्काऊटर मंगलसिंग सोळंके आणि संजयसिंह तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रा. डॉ. जयंत राजूरकर यांनी विशेष भूमिका बजावली.या उपक्रमासाठी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक खोने, पोलीस हवालदार चोपडे, तायडे आणि सोनुने यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले आणि उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.शहरातील नागरिकांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक योगदानाचे विशेष कौतुक केले आणि अशा प्रकारच्या उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

أحدث أقدم