नांदुरा: पृथ्वीवरील मनुष्य हा सज्ञान प्राणी म्हटल्या जातो.आज सर्व क्षेत्रांमध्ये मनुष्याने आपल्या अप्रतिम कार्याची छाप उमटवली आहे. पृथ्वीवर येणाऱ्या मनुष्याचा जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे. मात्र काही व्यक्तिमत्व आपल्या कार्यामुळे आपल्यात कायम आठवणीच्या रूपात वास्तव्य करतात. यांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजेच स्व. अजितजी इंगळेसर. म्हणजेच स्वातंत्र्य सैनिक, मा. आमदार साजसेवक लोकनेते स्व. जालमसिंग इंगळे सर यांचे नातू होय.मंगळवार दि. २४/०९/२०२४ म्हणजेच स्व. अजितजी इंगळे सरांचा जन्मदिन होय. मा. शेषरावजी इंगळे व सुशिलाबाई इंगळे या उदात्त दाम्पत्याच्या पोटी नांदुरा तालुक्यातील टाकळी वतपाळ या गावी झाला. स्व. अजितजी सरांनी आपले माध्यमिक शिक्षणघेत असताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. ग्राम टाकळी वतपाळ सह पंचक्रोशीतील अनेक गावांमधील मुल-मुली शिक्षणासाठी झटून बऱ्याच अडचणींचा सामना करत असत. स्व. अजितसरांनी आपले माध्यमिक शिक्षण सुरु असताना सर्वांना आपल्या भागात उत्तम शिक्षण सहज उपलब्ध व्हावं यासाठी स्वप्न बघितले. परंतु काळाला काही दुसरेच मंजूर होते स्व. अजितसर वैकुंठवासी झाले. मात्र त्यांनी बघितलेल्या स्वप्नामुळे ते कायम स्मरणात आहेत. त्यांचे भाऊ म्हणजेच अजित कॉन्व्हेंट चांदुर बिस्वा तथा अजित इंटरनॅशनल स्कुल, नांदुरा शाळेचे अध्यक्ष आदरणीय ऍड. सुजितजी इंगळे सर यांनी आपल्या बंधुचे स्वप्न केवळ स्वप्न न ठेवता सन २००४ मधे अजित कॉन्व्हेंट चांदुर बिस्वा यां शाळेची स्थापना केली. ग्राम टाकळी वतपाळसह पंचक्रोशीमधील सर्व गावांना मधील मुला मुलींना उत्तम शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. स्व. अजितजी इंगळे सर यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका सौ. सरिताताई बावस्कार यांच्या मार्गदर्शनात स्व. अजितसर इंगळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री गणगे यांनी केले. सीमाताई भगत यांनी स्व. अजितजी इंगळे सर यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. यासोबतच अजित कॉन्व्हेंट चांदुर बिस्वा येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. डॉ. किशोर घाटे सर, मेडिकल ऑफिसर नांदुरा, डॉ. उज्वला खिल्लारे मॅडम आरोग्य अधिकारी मलकापुर, वर्षा वानखडे मॅम - नर्स आणि प्रदीप राजकार सर - फर्मसिस्ट यांनी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि आरोग्य शिबीर संपन्न करण्यात आले.आरोग्य शिबिरासाठी पूर्व- प्राथमिक वर्ग तसेच प्राथमिक वर्गांतील विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभाग नोंदविला. यावेळी अजित कॉन्व्हेंट, चांदुर बिस्वा येथील शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अजित कॉन्व्हेंट चांदुर बिस्वा येथे स्व. अजित इंगळे यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबीर संपन्न...!
Hanuman Sena News
0
إرسال تعليق