Hanuman Sena News

लाडक्या बाप्पाला निरोप; गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ...



मलकापूर: गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याचा क्षण कितीही भावूक असला तरी, पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या असे म्हणत गणपती बाप्पाला आनंदाने निरोप दिला जातो.गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात दहा दिवसांनी बाप्पााला निरोप दिला जाणार आहे.भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणारा गणेश चतुर्थीच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून, गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत दहा दिवसांच्या गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे.गणपती बाप्पा जसे वाजत-गाजत येतात तसेच धूमधडाक्यात वाजत-गाजत जातात. लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, सार्वजनिक मंडळात सत्यणारायण पूजा आणि भंडाराचा आस्वाद भाविकांनी घेतला आहे. बाप्पाचं विसर्जन करताना मन अतिशय निराश होतं,पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते श्रींच्या विसर्जनासाठी चोख पोलीस बंदोबस्तासह विविध व्यवस्थेची पूर्तता प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात आली आहे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलीस व पालिका आणि संबंधित विभागाकडून विविध व्यवस्था पूर्णत्वास नेण्यात आल्या आहे 

"डोळ्यात आले अश्रू
बाप्पा आम्हाला नका विसरु,
आनंदमय करुन चालले तुम्ही
पुढल्या वर्षी आम्ही तुमची वाट पाहू
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या...!
अनंत चतुर्दशी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!

Post a Comment

أحدث أقدم