मलकापूर: दि. 12 सप्टेंबर 2024 स्थानिक लिलाधर भोजराज चांडक विद्यालयाच्या स्काऊट-गाईड तुकडीने जिल्हा अतिरिक्त न्यायालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांनी न्यायालयीन प्रक्रियांची माहिती घेतली आणि न्यायालयातील विविध कायदे व कामकाजाच्या पद्धतींचे निरीक्षण केले विद्यार्थ्यांना मा.न्यायमूर्तींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन व्यवस्थेचे महत्त्व, कायद्याचे पालन,आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी खटले कसे चालतात, न्यायप्रक्रियेची गती,आणि न्यायाधीशांची भूमिका या विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळवली.तसेच,उपस्थित असलेल्या ऍड.योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेबद्दल मोलाची माहिती दिली.स्काऊटर श्री.मंगलसिंह सोळंके यांनी या भेटीचे नियोजन केले.तर, प्राचार्य डॉ.जयंत राजूरकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे आणि कायदेशीर व्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगणे असे होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कायदेविषयक ज्ञानात वृद्धी केली आणि न्यायप्रक्रियेचे महत्त्व समजले.या अनुभवातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनासाठी उपयुक्त माहिती मिळाली असून, भविष्यात जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रेरणा मिळाली.
चांडक विद्यालयाच्या स्काऊट-गाईडची जिल्हा अतिरिक्त न्यायालयाला भेट...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق