बुलढाणा: राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी त्यांना योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत मुख्यमंत्री योजना दूऊ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक योजना दूत नेमला जाणार असून त्याला सहा महिन्याकरिता महिन्याकाठी 10000 हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण, वयोश्री, तीर्थ दर्शन या योजनेअंतर्गत आता सरकारने मुख्यमंत्री योजना दूत योजना सुरू केली आहे. या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.ग्रामीण भागात ग्रामपंचायत साठी 1 तर शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1योजनादूताची निवड होणार आहे. जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायत मध्ये योजना दूत नेमले जाणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असावे. संगणक ज्ञान,त्याच्याकडे अद्यावत मोबाईल (स्मार्टफोन) आणि आधार सलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. योजना दूत निवडीसाठी लागणारी कागदपत्रे विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज,आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील 13 सप्टेंबर 2024 पर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
आता ग्रामपंचायती मध्ये नेमणार योजनादूत...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق