Hanuman Sena News

व्यसन मुक्त गणेश उत्सव साजरा करावे - विहिंप चे आव्हान...

 मलकापूर - मलकापूर शहर भातृ मंडल येथे मलकापूर शहर पोलीस स्टेशन द्वारा आयोजित गणेशोत्सव निमित्त सर्व गणेश मंडळ तसेच शांतता कमिटी सदस्य यांची बैठक जिल्हा अपर पोलीस अधीक्षक साहेब,मलकापूर तालुका, शहर,एम.आय.डी.सी, रेल्वे पोलीस निरीक्षक, मलकापूर नगरचे तहसीलदार, नगरपालिका सी.ओ साहेब यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित शांतता समिती बैठकीत व्यसन मुक्त गणेश उत्सव आयोजन बाबत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मलकापूर तर्फे सर्व गणेश मंडळ यांना आव्हान करण्यात आले गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा सण आहे.जो केवळ धार्मिक आस्थेचा नाही, तर सामाजिक एकजुटीचाही संदेश देतो. या उत्सवाचे औचित्य साधून, आपल्या समाजातील विविध समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना करण्यासाठीही हे एक उत्तम व्यासपीठ ठरू शकते. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यावतीने सर्व गणेश मंडळांना विनंति केल्या गेली की समाजाच्या हितासाठी गणेश मंडल अध्यक्ष व कार्यकारणी समिती यांनी गणेशोत्सवात व्यसनमुक्ती मेडिकल कॅंप तसेच समुपदेशनाचे आयोजित करण्याचा विचार करावा. या करिता विश्व हिंदू परिषद सेवा विभाग आपली मदत करेल.या वेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री सुयोग शर्मा यांनी व्यसनमुक्तीची गरज बाबत आपल्या संभाषणात म्हणाले की आजच्या काळात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. तंबाखू, दारू,अमलीपदार्थ आणि इतर नशा द्रव्यांमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. हे व्यसन फक्त व्यक्तीचे शारीरिक आरोग्य बिघडवत नाही, तर मानसिक आणि सामाजिक समस्यांनाही जन्म देते.अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी बनते की या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. यात आपले गणेश मंडळांची मोठी भूमिका निभावू शकतात गणेश मंडळं हे सामाजिक जागरूकतेचं एक महत्त्वाचं साधन आहे. गणेशोत्सवात हजारो लोक मंडळात येतात. या लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे एक उत्तम साधन आहे. व्यसनमुक्ती मेडिकल कॅंप आयोजित केल्यास, यामध्ये आपल्या वस्ती मधील व्यसनाधीन व्यक्तींना मदत करता येईल, तसेच व्यसनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करता येईल या करिता चिकित्सा तपासणी-कॅंपमध्ये तज्ञ डॉक्टरांद्वारे व्यसनाधीन व्यक्तींची तपासणी केली जाईल. यात त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासले जाईल.सल्ला आणि उपचार-तपासणीनंतर, योग्य सल्ला आणि औषधोपचार दिले जातील. व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल.जागरूकता कार्यक्रम- कॅंपमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता कार्यक्रम, व्याख्यानं आणि शॉर्ट फिल्म्स दाखवता येतील.फॉलो-अप आणि समर्थन- कॅंपनंतरही व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींना मंडळ आणि तज्ञ डॉक्टरांकडून नियमित मार्गदर्शन आणि समर्थन दिलं जाईल.या द्वारे समाजाला होणारा फायदा म्हणजे स्वस्थ समाजाची निर्मिती व्यसनमुक्त व्यक्तींमुळे समाजाच्या आरोग्याच्या स्थितीत सुधारणा होईल.कुटुंबांमध्ये आनंद व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबं पुन्हा एकत्र येतील आनंद आणि समाधान परत येईल. तरुणाईला नवा मार्ग तरुणाईला व्यसनमुक्तीची दिशा दाखवल्यामुळे त्यांची ऊर्जा सकारात्मक कार्यांमध्ये खर्च होईल.

Post a Comment

أحدث أقدم