मलकापूर :- बांग्लादेशातील हिन्दूधर्मीय बांधवांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचार बाबत महामहीम राष्ट्रपती साहेब,भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर मार्फत निवेदन 20 ऑगस्ट रोजी सकल हिंदु समाज च्या वतीने निवेदन देण्यात आले.सकल हिंदु समाज द्वारें पुकारण्यात आलेल्या बंदला मलकापूर शहरातील शाळा,महाविद्यालय, यांच्यासह शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या बंदला 100% प्रतिसाद दिला.मलकापूर तालुक्यातील सर्व शाळा ही बंद ठेवण्यात आल्या मुळे तालुक्यातील एस टी बस व्यवस्था ही कोडमडलेली दिसली.सदर सकल हिंदू समाज तमाम हिंदुत्ववादी राजकीय संघटना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रिय स्वयंसेवक संघ,शिवसेना (शिंदे गट ) जात,पात, पक्ष,पंथ भेद विसरून एकत्रित येऊन हिन्दू हितांच्या रक्षणाकरिता निवेदन राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनामध्ये नमूद होते की, सर्व प्रकारच्या माध्यमांव्दारे ज्ञात होणान्या विविध बातम्यांवरून बांग्लादेशातील हिन्दूवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे. त्यांची घर-दारे लुटण्यात येऊन संपत्तीची नासधूस करण्यात येत आहे व त्यांच्या जिवीतालाही धोका आहे.असंख्य हिन्दू बांधवांची कत्तल करण्यात आली आहे. हिन्दूच्या स्त्रियांवर देखील अत्याचार करण्यात येत आहेत. हिंदू धर्मीयांची मंदीरे उध्वस्त करण्यात येत आहेत. तेथील हिन्दू धर्मीय बांधव काही धर्माध वृत्तीच्या लोकांच्या हिंसाचाराला बळी पडत आहेत. बांग्लादेशात एक कोटींहून अधिक हिन्दू नागरिक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने हिन्दू जनता बचावासाठी आक्रोश करीत आहे तरी जागतिक शक्ती त्यापासून अलिप्त आहेत. याठिकाणी उल्लेखनिय आहे कि,पाकिस्तानी राजवटीने तात्कालिन पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर अत्याचार केले तेव्हा शेख मुजिबूर रहेमान यांच्या मुक्तिवाहिनीला भारताने हर तरेने मदत दिली. त्याचा परिणाम असा कि, १९७१ साली बांग्लादेशची निर्मिती झाली. गेल्या ५० वर्षात बांग्लादेशाने नेत्र दिपक प्रगती केली. त्यात भारत सरकारचाही मोलाचा वाटा आहे. त्यात हिन्दू समाजाचाही मोठा वाटा आहे. परंतु तेथील प्रतिगामी शक्ती आपले डोके वर काढून हिन्दूंवर अनन्वित अत्याचार करीत आहे. बांग्लादेशातील हिन्दूंवरील अत्याचार त्वरीत थांबवावे. तेथील सरकारने शांतता प्रस्थापित करण्यात हयगय करू नये व पाकधार्जीण्या वृत्तीला ठेचून काढावे अन्यथा भारतातील सकल हिन्दू समाज स्वस्थ बसणार नाही याची दखल घ्यावी. त्यासाठी भारत सरकारने तटस्थ भूमिका सोडून तेथील सरकारवर दबाव आणावा व तेथील हिंदूंना संरक्षण देण्यात यावे अशी कळकळीची भावना व्यक्त करीत आहोत.असे निवेदनात नमूद केले आहे.महामहीम राष्ट्रपती महोदया यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रतिलिपी गृहमंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री, तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठवण्यात आल्या.निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषद, व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद राजदेव,शिवसेना (शिंदे गटाचे) शहर प्रमुख किशोर नवले, शिवसेना शहर उपप्रमुख उमेश हिरुळकर,राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष अरुण अग्रवाल, समतेचे निळे वादळ चे संस्थापक अशांत भाई वानखेडे नगरसेवक सुहास चवरे, नगरसेवक मुकेश लालवानी , नगरसेवक राजेश फुलोरकार,नगरसेवक अनिल बगाडे ,हनुमान सेनेचे अमोल टप, नानाभाऊ येशी,शिव प्रतिष्ठान चे विशाल शर्मा, विक्रम पाटील, प्रफुल्ल पिसे, श्रीराम प्रतिष्ठान चे आशिष माहुरकर, बिजीपी युवा मोर्चा तर्फे यश संचेती, दुर्गेश राजापूरे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे अमित हिंगणकार, धनंजय भोबे, आंतरराष्ट्रीय बजरंग दलचे जीवनसिंह राजपूत यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
बांग्लादेशातील हिन्दू बांधवांवर होणाऱ्या अत्याचार व हिन्दु बांधवांच्या संरक्षणा बाबत मलकापूर कडकडीत बंद...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق