Hanuman Sena News

विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळाची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न...


नांदुरा : लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये पुण्यातील विंचूरकर वाड्यात गणेशाची स्थापना केली. त्यावर्षी पुण्यात 100 हून अधिक सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली होती. हा गणेशोत्सव आता पुण्यातच मर्यादित राहिला नसून संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा च्या स्वरूपात व घरोघरी साजरा केला जातो. बहुतांश म्हटल्यापेक्षा सर्वच सार्वजनिक मंडळे ही पुरुषप्रधान लोकच चालवतात. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव महिला गणेशोत्सव मंडळाची स्थापना वर्ष 2022 ला
नांदुरा खुर्द वंदे मातरम चौक येथे सौ सरिताताई प्रकाश बावस्कार यांनी महिला व युवतींना संघटित करून केली.यावरच न थांबता शे-दोनशे युवती व महिलांना सोबतीला घेऊन विघ्नहर्ता लेझीम पथक व ढोल ताशा पथक सुरु करून पारंपारिक वाद्य व संस्कृती ला पुढे नेऊन जोपसण्याचा वसा उचलला.सन 2024 म्हणजेच यावर्षी देखील विघ्नहर्ता महिला मंडळाच्या गणपतीचे थाटात आगमन व्हावे यासाठी मंडळाच्या वतीने २१ ऑगस्ट वार बुधवार रोजी महिला वं युवती यांची बैठक घेतली.बैठकीमध्ये गणेशोत्सव आगमन सोहळ्यापासून गणेश विसर्जनापर्यंत मंडळात घ्यावयाचे समाजपयोगी कार्यक्रम, खेळ,आध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली. युवती व महिला यांमधील मतभेत संपवून एकोप्याच्या भावनेने संघटन कसे वाढेल यावर चर्चा करून सर्वसंमती ने दरवर्षी प्रमाणे सरिताताई बावस्कार यांना मंडळाच्या अध्यक्ष घोषित करून दहा दिवसीय कार्यकारणी मंडळ घोषित करण्यात आले.बैठकीला सविता बडवे, सुनंदा नारखेडे,अक्षया बडवे,कांचन बावस्कार,नलिनी पाटील,माया बडवे यांच्या समवेत मंडळाच्या सदस्या हजर होत्या.
मंडळाची कार्यकारणी 
अध्यक्ष : सरिता प्रकाश बावस्कार 
उपाध्यक्ष : शशिकला नारखेडे 
कार्याध्यक्ष : लीलाबाई डिवरे 
कोषाध्यक्ष : शिलाबाई नेमाडे 
सहकोषाध्यक्ष : शांताबाई सातव 
सचिव : प्रिया रंभाडे 
युवती कार्यकारणी : नेहा मंडवाले, दिव्या घडेकार, रेणुका राखोंडे,दुर्गा मुऱ्हेकर,समिक्षा बडवे, राणी सावळे,धनश्री दाभाडे. बैठकीच्या शेवटी  सरिता ताई बावस्कार यांनी सर्वांना "देव, देश, धर्म व संघटन" या चार शब्दांच्या चौकटीमध्ये राहून जीवन जगण्याचे आवाहन केले.

Post a Comment

أحدث أقدم