Hanuman Sena News

लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती ढोल ताशा पथकाच्या निनादात मोठ्या उत्साहात साजरी...


नांदुरा: भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हजारो क्रांतीकारकांनी आपल्या रक्ताची होळी खेळून परकीय राजवटीमधून आपला मुक्त केला. मात्र भारतीय समाज व समाजाला योग्य दिशा दाखवून समाजामध्ये बदल करण्याचे काम समाजसुधारकांनी केले.स्वतंत्र भारताच्या चळवळीत मोठे योगदान देणारे, समामोठ्याजा मधील काही अनिष्ठ प्रथा, अंधश्रद्धा नष्ट करून समाजाला नवीन दिशा दाखवीन्याचे व त्या मार्गाने चालणे शिकविण्याचे काम करणारे, "हे मानवा तु गुलाम नाहीस. तु या वास्तव जगाचा निर्माता आहेस" असे ब्रीद वाक्य जगाला देणारे थोर समाज सुधारक, लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते.गुरुवार दि. ०१/०८/२०२४ रोजी 'अण्णाभाऊ साठे उत्सव समिती मंडळ, नांदुरा खुर्द' यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्रित येऊन शोभा यात्रा काढण्यात आली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला सौ उमाताई तायडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, सौ सरिता बावस्कार शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी व इतर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेला सुरवात करण्यात आली शोभा यात्रेत तालुका नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात प्रसिद्ध होत असलेले मुलींचे विघ्नहर्ता ढोल ताशा पथक आमंत्रित केले होते. पथकाच्या शिस्तेणे व जल्लोषमय वादनाने शोभयात्रेची शोभा ही द्विगुणित झाली.शोभा यात्रा काढण्यासाठी प्रेरणास्थान शुभम वाकोडे व सुशील इंगळे असुन  अध्यक्ष : दिलीपभाऊ सावळे उपाध्यक्ष : अजय पाटोळे सदस्य : सचिन तायडे,दीपक पाटोळे,गौरव म्हस्के, दुर्गेश पाटोळे, अमोल पाटोळे, सूपेश पाटोळे, रमण पाटोळे, अशोक पाटोळे, कार्तिक पाटोळे,सागर पाटोळे,प्रेम सोनवणे, अजय खुळे, मनोज सूर्यवंशी, मयूर पाटोळे, शुभम पाटोळे, तुषार सावळे,प्रथम बोदडे, राहुल अडायके,गौरव सोनोने, कृष्णा दाभाडे, विलास वानखडे, मंगल पारेकर,धनंजय जाधव, पिंटू बोदडे, अशोक जाधव, रमेश वारके बबलू पाटोळे, श्याम पाटोळे,निळू पाटोळे, अशोक पवार व मोठ्या प्रमाणात स्त्री,पुरुष, युवती व युवकांचा समावेश होता.पारंपारिक ढोल ताशा वादन व शिस्तीमध्ये निघालेल्या अशा या मिरवणुकीची गावात सर्वत्र चर्चा होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم