Hanuman Sena News

ओम शांती सेवा समितीतर्फे अनाथाश्रम व वृद्धाश्रमाचे मलकापूरमध्ये भूमिपूजन...


मलकापूर : येथील ओमशांती सेवा समितीच्या वतीने बेलाड येथील गोशाळे जवळ अनाथ वृद्धाश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजेश एकडे आणि उद्घाटक डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला.ओमशांती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सचिन शांतीलाल भंसाली यांनी या कार्याला पुढाकार घेत डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तर आमदार एकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी सचिन भंसाली यांच्या हातून समाजकार्य घडो अशी प्रार्थना केली. सर्व मान्यवरांचे शिल्ड व शाल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी महादेवराव गावंडे, विजयकुमार डागा, चिंदु पाटील, अशांतभाई वानखेडे, दामोदर शर्मा, राजूभाऊ पाटील, हनुमान जगताप, अजय टप, सुमेरचंद भंसाली, भिकमचंद भंसाली, सचिन भंसाली अमोल टप, नानाभाऊ येशी,जयकुमार राठी, विमल संचेती, रोशन जैन, विजय गोठी, जितेंद्र मेहता, समीर महानकर, किरीट पोपट, डॉक्टर युसुफ खान, सुरेशभाऊ संचेती, शुभम नवले, वीरू कासे, रोशन जैन, संदेश संचेती, राजू घोडके, निलेश चोपडे, विवेक राजापुरे, विशाल श्रीनाथ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन भंसाली यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم