Hanuman Sena News

शोषित, पीडित, वंचित समाजाचे रक्षण करणे हेच सेवा कार्याचे उद्दिष्ट एडवोकेट अमोल अंधारे यांचे प्रतिपादन...


मलकापूर : लाइफ केअर हॉस्पिटल येथे विश्व हिंदू परिषद बजरंगदला मार्फत आयोजित मोफत वैद्यकीय सेवा सप्ताहाचा समारोप 2200 गरजू रुग्णांनी घेतला मोफात आरोग्य सेवेचा लाभ बजरंग दल मार्फत संपूर्ण  राष्ट्र मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन केले जाते. या द्वारे  समाजाचे जागरण केले पाहिजे म्हणून सेवा, सुरक्षा,संस्कार  या माध्यमातून लव्ह जेहाद थांबवणे,  धर्मांतरण थांबवणे, गोवंश हत्या थांबवणे या व्यतिरिक्त समाजात राहून समाजातील शोषित, पीडित, वंचित समाजाचे हिताचे रक्षण करणे हे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्य आहे.परंतु शोषित, पीडित,वंचित समाजावर वर  काही लोक अन्याय करतात आर्थिक बाजू कमजोर असल्याने ते आपले व आपल्या परिवाराची स्वास्थ बाबत निघा राखू शकत नाहीं. या समाजाच्या अशिक्षित लोकांचा फायदा घेऊ नये म्हणून आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजापर्यंत जाऊन वेळ प्रसंगी वेगवेगळे कार्यक्रम राबवून धर्म टिकवण्याचे काम सुद्धा  बजरंग दलाच्या वतीने सेवा सप्ताहाच्या माध्यमातून होते.रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा याला कोणत्याही जातीचे पंथाचे धर्माचे बंधन नाही. सेवा देताना आपण धर्माचा विचार करत नाही ज्या ज्या लोकांना सेवा पाहिजे त्या त्या लोकांना आपण सेवा त्यांच्या वस्ती मध्ये देतो.मानवतावाद आपला धर्म शिकवितो, म्हणून कोणावर अन्याय होणार नाही पण कोणाचा अन्यायही सहन करणार नाही हे आपल्याला धर्म शिकवितो असे प्रतिपादन  बजरंग दलाच्या वैद्यकीय सेवा सप्ताह च्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये   विश्व हिंदू परिषद चे विदर्भ प्रांत सहमंत्री एडवोकेट अमोल अंधारे या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार व्यक्त केले.दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बजरंग दलाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन या वर्षी वैद्यकीय सेवा सप्ताह दरम्यान देण्यात आली दिनांक 27 जून ते 5 जुलै पर्यंत करण्यात आले होते. यामध्ये एकूण 53 डॉक्टर व चार संस्था  यांनी सेवा दिल्या.सदर कार्यक्रमांमध्ये   विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री एडवोकेट अमोल अंधारे, नगर संघ चालक दामोदर लखानी, डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर सौ. केतकी ताई पाटील, तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी, विश्व हिंदू परिषद चे  जिल्हा मंत्री राजेंद्र सिंह राजपूत, जिल्हा सेवा प्रमुख डॉ.भावेश चव्हाण, जिल्हा सेवा सहप्रमुख डॉ. मुकेश गोठी, डॉक्टर संघटना मधुन आय एम.ए चे डॉ .विशाल झंवर, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोद हागे पाटील, हि.एम.पा संघटनेचे डॉ. प्रवीण राणे ,केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मालपाणी  हे प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावर होते.पुढे  डॉ. केतकी ताई पाटील यांनी बोलताना सांगितले की बजरंग दलाकडून सेवा सप्ताह आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावागावात वस्ती वस्ती मध्ये जाऊन गरजू रुग्णांना  सेवा दिली गेली आहे. यापुढे देखील मी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल  सोबत राहून समाजाच्या अंतिम घटका पर्यंत भविष्यात ही सेवा दिली जाईल. अशी शिबिरे वार्षिक न घेता मासिक व आठवड्यातून घेऊन गरजू रुग्णांना सेवा पुरवल्या जातील असे केतकी ताई पाटील यांनी बोलताना सांगितले.या शिबीर मध्ये होणारे संपूर्ण मोफत उपचार व औषधी वितरण व्यवस्था होती.त्या मध्ये  हृदय रोग तपासणी, दमा, अलर्जी, फूफुस रोग तपासणी अस्थि रोग तपासणी, मधुमेह तपासणी त्वचारोग तपासणी ,बालरोग तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, स्त्रीरोग तपासणी,रक्तदाब व रक्तगट तपासणी मोफत नेत्र तपासणी मोतियाबिंदू निदान उपचार आणि शत्रक्रिया साह्य  मोफत E.C.G चाचणी  ,दंत रोग व मुखरोग तपासणी सर्व तज्ञ डॉक्टर द्वारे निदान तसेच उपचार करण्यात आले होते.या मोफत अयोग्य शिबिरा मधुन  एकूण 2200 रूग्ण यांची मोफत तपासणी व औषद वितरण करण्यात आले एकूण 15,30,000 राशीचे नेत्र मोतिया बिदूची शस्त्रक्रिया तर 350 हृदय रुग्णांचे इ.सी.जी मोफत काढण्यात आले यामधून 160 नेत्र शास्त्रक्रिया डॉ उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.350 सुगर चाचणी,110 रक्तगट तपासणी 200 हून अधिक ई.सी.गी तपासणी या शिवाय शिबिरामध्ये हृदय रोगाचे जे रुग्ण आढळले आहेत त्यांच्यावर पुढील तपासणी तसेच उपचार मोफत करण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जवळ पास ५० लाख रुपयांची बचत झाली आहे.विश्व हिंदू परिषद - बजरंग दल वैद्यकीय सेवा चिकित्सा सप्ताह मोफत वैद्यकीय शिबिर मध्ये हृदयरोग, दमा, टी.बी, मधुमेह, थायरॉईड तज्ज्ञ, तसेच फिजीशियन ची सेवा सेवा डॉ.विशाल झंवर,डॉ पवन अग्रवाल ,डॉ. चेतन जाधव, डॉ अमोल फिरके,डॉ.नितीन बराटे,
डॉ राजेश झंवर ,डॉ. रुपेश वर्मा, डॉ. मुकेश गोठी अस्थिरोग तपासणी सर्जन- डॉ. मनोज पाटील,डॉ. राहुल चोपडे ,डॉ. प्रशांत माने जनरल सर्जन - डॉ. विनोद हागे पाटील, डॉ. अनुप धोरण, डॉ. स्वप्नील चोपडे होमिओपॅथिक तज्ञ:डॉ. सुहास खंगार, डॉ. योगेश पटणी, डॉ. मुकेश केला ,डॉ. प्रशमिन अग्रवाल, डॉ. विवेक डागा, डॉ. चेतन सोनोने, डॉ. वैष्णवी खूपसे, चर्मरोग तपासणी :डॉ. कृष्णा वाघ आयुर्वेदिक तज्ञ: डॉ. प्रसन्ना काबरा, डॉ. राम काकडे, डॉ. अमित चौधरी,कान नाक आणि घसा तज्ञ: डॉ. भावना पाटील स्त्री रोग तज्ञ :डॉ. मयुरी धोरण,डॉ. प्रतीक्षा देशमुख,डॉ. नीलाश्री राजपूत ,डॉ. कल्याणी खांदे  दंत व मुख रोग तपासणी :डॉ. श्रेयस व्यवहारे, डॉ. श्रीराम गिडवाणी बालरोग तपासणी : डॉ. रिया चोपडे ,डॉ. मितेश टावरी, डॉ. विजयसिंह राजपूत, डॉ. प्राशिक गुरचळ नेत्र तपासणी मोतीया बिंदू निदान : माधुरी पाटिल,अर्णव नैत्रालय डॉ. प्रफुल डहाके रक्त तपासणी तज्ञ : डॉ. गिरीश टावरी संदीप लंबोदरी, पॅथॉलॉजी तंत्रज्ञ तर मोफत नेत्र तपासणी मोतियाबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया उपचार करिता संत श्री. जंगली महाराज लॉयन्स नेत्रालय, नांदुरा आणि हृदय रोग व शस्त्रक्रिया  डॉ. उल्लासराव पाटील वैदिक ए महाविद्यालय संस्था जलगांव यांचे द्वारे लाभले.या भव्य आरोग्य मेळावा चे सेवाकार्य तालुका संयोजक डॉ.मुकेश गोठी  तालुका सेवा कार्य सह संयोजक दीपक कपले,मलकापूर शहर सेवा कार्य संयोजक डॉ.मितेश टावरी,शहर सेवा कार्य सहसंयोजक  दिपक कोलते तसेच समस्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका व शहर समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नीताताई कुटे मातृशक्ती सत्संग संयोजिका यांनी केले. तर  प्रास्ताविक डॉक्टर मुकेश गोठी विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग सह प्रमुख तर आभार प्रदर्शन प्रखंड मंत्री दिलीप पाटील यांनी केले.सदर समारोपय कार्यक्रमा करिता शहरातील सर्व गणमान्य मान्यवर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم