Hanuman Sena News

मराठा सेवा संघातर्फे सामाजिक संघटना हनुमान सेनेला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले...





मलकापूर: मलकापुरात गेल्या अनेक वर्षांपासून दिवस-रात्र अखंड रुग्णसेवे साठी सदैव तत्पर कार्य करणारी हनुमान सेना एक समाजसेवी संघटना आहे. कुणी कुठेही अडचणीत असू द्या कोणाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता भासली तर निस्वार्थ सेवाभावी आणि माणुसकीचे नाते जपत हनुमान सेना सहकार्य करण्यास तत्पर असते अगदी रुग्णसेवा असो, आरोग्य शिबिर असो रक्तदान असो किंवा अगदी सांगायचे झाल्यास कोरोना सारख्या संकटाच्या काळात सुद्धा या समाजसेवी संघटनेने काम करून जनजागृती केली आहे एकही दिवस नसेल की त्यांनी कोणाची मदत केली नसावी याचेच अवचित्त साधून आज दिनांक 28/ 6 /2024 मलकापूर मराठा सेवा संघ मलकापूर तालुका यांच्यातर्फे हनुमान सेनेचे चालू असलेले सामाजिक कार्य रक्तदान , हनुमान मंदिर जीर्णोद्धार चालू असलेले समाजकार्य याची दखल घेत मराठा सेवा संघातर्फे हनुमान सेनेचा मराठा मंगल कार्यालय येथे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप, हनुमान सेना न्यूज चे संपादक नानाभाऊ येशी, वीरेंद्र कासे, पंकज पाटील, शुभम नवले, ए पी अमोल पाटील, अमोल मोरे ,वैभव पाटील,रोहित कांडेलकर ,मंगेश गव्हाळे, अमरदीप टप इत्यादी हनुमान सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم