मलकापूर: भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. आ. चैनसुखंजी संचेती, जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. डॉ. संजयजी कुटे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे तसेच खामगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. आकाशदादा फुंडकर, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षा मा. श्री. राहुलजी लोणीकर तसेच भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री. बादलजी कुलकर्णी, प्रदेश सचिव श्री. प्रणितजी सोनी, प्रदेश सचिव श्री. शिवराजजी जाधव, प्रदेश सचिव श्री. रामजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली खामगांव युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक आज आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात संघटनात्मक चर्चा करण्यात आली व खामगांव जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नवीन मतदार नोंदणी अभियान राबवून जास्तीत जास्त नवमतदार आपल्या यादी मध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी खामगांव भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. सचिनजी देशमुख तसेच बुलढाणा जिल्हा लोकसभा समन्वयक मा. श्री. मोहनजी शर्मा, भाजपा जिल्हासरचिटणीस श्री. ब्रह्मानंदजी चौधरी, जिल्हासरचिटणीस डॉ. गणेशजी दातीर, कायम निमंत्रीत सदस्य श्री. सुरेशदादा संचेती, मलकापूर भाजपा शहरध्यक्ष श्री. शंकररावजी पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश भैया संचेती , भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकरणी सदस्य श्री. उमेशजी वाघ भाजप युवा मोर्चा जिल्हासरचिटणीस डॉ. अमोलजी कुकडे यांच्यासह भाजप युवा मोर्चा पदाधिकारी, शहरध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच विधानसभा प्रमुख यांची उपस्थिती होती.
भाजप युवा मोर्चा, खामगांव जिल्ह्याची प्रथम कार्यकारणी बैठक मलकापूर येथे पार पडली...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق