नांदुरा: आजच्या या स्पर्धेच्या युगात मुले भरपूर व उत्तम शिक्षण घेतात व आपल्या ध्येयापर्यंत पोहचतात. मात्र त्यांच्यामध्ये संस्कारांचा अभाव आपल्याला दिसून येतो. म्हणूनच वार्षिक परीक्षा संपली की, उन्हाळी शिबिरांचे वेध लागतात. कौशल्याबरोबरच सुटीमध्ये मुलांचा वेळ सत्कारणी लागावा म्हणून ही संस्कार वर्ग असतात. मुलांवर उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदूपयोग व्हावा मुलांना चांगले संस्कार मिळावे या साठी नांदुरायेथील प्रसिद्ध तपस्वी, त्यागाचीमूर्ती असलेल्या साध्वी सर्वेश्वरी दिदी व विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळ नांदुरा खुर्द यांच्या संयुक्त विद्यमानातून निशुल्क दहादिवसीय बाल - संस्कार शिबीराला शिवालय आश्रम (हरसिद्धी लॉन) येथे सुरुवात केली.आज शनिवार दि०१/०६/२०२४ म्हणजेच वैशाख कृष्ण दशमी आईसाहेब मुक्ताई यांचा स्वरूपाकाल (गुप्तदिन) होय या शुभमुहूर्तावर साध्वी सर्वेश्वरी दिदी यांनी या निशुल्क बाल - संस्कार शिबीरास सुरुवात केली. संस्कार वर्ग आणि शिबिरात मुलांना तात्त्विक मूल्ये, महान भारतीय संस्कृतीचा इतिहास, संगीत, नृत्य, खेळ, चित्रकला अशा विविध कलांची जपणूक, दैनंदिन जीवनातील कौशल्ये, स्वसंरक्षणासाठी आवश्यक असणारी तत्वे,यातूनच विद्यार्थ्यांची आवड-निवड जपली जाऊन भारतीय जीवनशैलीविषयी जगभरात महत्व , संस्कृत प्रार्थनेबरोबरच, संवादात्मक सुत्रे, विविध उपक्रम, भारतीय चालीरीती, सण, जगप्रसिद्ध महान व्यक्ती क्रांतिकारकांच्या कथा इत्यादींद्वारे मुलांना संस्कार वर्गात जीवन कौशल्ये शिकवली जातील, तसेच प्रत्येक विचार व कृती मुलांच्या मनावर कायमची नोंदविल्या जाईल. कला, संगीत, खेळ यामुळे मुलांमधील सर्जनशीलता वाढीस लागते. त्यामुळे नवनवीन कौशल्यांचा विकास होतोच त्याचबरोबर ज्ञान वाढीसाठीही या संस्कारवर्ग शिबिरांचा मोलाचा फायदा होतो. येथील विविध उपक्रमांमुळे मुलांचे सर्वांगीण कौशल्य विकासाला चालना मिळते. मुले समाजात वावरायला शिकतात. एकमेकांशी संवाद साधायला शिकतात. यामुळे त्यांचे मन, विचार आणि बुद्धी समृद्ध व्हायला मदत होते.या आदिशक्ती मुक्ताई बाल - सुसंस्कार शिबीरातून मुलांचे कौशल्य विकसित होऊन ज्ञानाचा साठा वाढण्यास निश्चितच मदत होईल.आजच्या या आदिशक्ती मुक्ताई बाल - संस्कार शिबीराला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय व या शिबिराला विशेष सहाय्य श्री सचिन भाऊ भिसे, डॉ उमेश बढे साहेब व सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख, विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ.सरिताताई प्रकाश बावस्कार यांचे लाभले.
नांदुरा येथे साध्वी सर्वेश्वरी दीदी व विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून निशुल्क आदिशक्ती मुक्ताई बाल -संस्कार शिबीरास प्रारंभ...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق