मलकापूर: दि 28 मे 2024 स्थानिक नगर सेवा समिती द्वारा संचालीत ली. भो. चांडक विद्यालयाची विद्यार्थीनी कु. रोहिणी अनंत लोजुळकर हिने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून मलकापूर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा चांडक विद्यालयाने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे, विद्यालयाचा एकूण निकाल ९६.१० टक्के ऐवढा लागला असून त्यामध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये १३४ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे २७ विद्यार्थी आहेत. कु. रोहीणी लांजुळकर हीने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून पहिली तर कु प्रेरणा रमेश पारसकर हीने ९५.४० टक्के गुण प्राप्त करून विद्याल यातून दुसरी व कु. शरयु मालगे होने ९४.२० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून तिसरी ठरली आहे.दरवर्षी तालुक्यातुन टॉपर येण्याचा बहुमान नेहमी प्रमाणे चांडक विद्यालयाला मिळाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, व शिक्षकानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चांडक विद्यालयाची रोहीणी लांजूडकर तालुक्यात प्रथम...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق